Germany: एवढी सुंदर आहे ही पोलीस अधिकारी की, चोरही म्हणतात मला अटक करा...

कोलेझर अतिशय ग्लॅमरस असून, त्यांचे सौंदर्य अनेक तरुणांना भुरळ घालते.
Adrienne Koleszar
Adrienne KoleszarDainik Gomantak
Published on
Updated on

अॅड्रिएन कोलेझर यांची जर्मनीतील सर्वात सुंदर, हुशार आणि सक्षम पोलिस अधिकारी म्हणून ओळख आहे. कोलेझर यांना जर्मनीच्या हॉटेस्ट कॉप (Germany’s hottest cop Adrienne Koleszar) देखील म्हटले जाते. कोलेझर ड्रेसडेन शहरात आपली सेवा बजावतात पण, त्यांची संपूर्ण युरोपात चर्चा होत असते. सौदर्याची मोठी देणगी लाभलेल्या अॅड्रिएन कोलेझर यांच्या बद्दल असे म्हटले जाते की चोर स्वत: त्यांना मला अटक करा अशी विनंती करतात.

Adrienne Koleszar
Adrienne KoleszarDainik Gomantak
Adrienne Koleszar
Rajnath Singh: डर्टी बॉम्बच्या धोक्यानंतर भारताने व्यक्त केली चिंता

पोलिसांची ना मैत्री चांगली ना दुश्मनी. खाकी वर्दीची भीती साऱ्या जगात जवळपास सारखीच असते. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच भयमुक्त प्रशासन ही देखील पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांना अनेकदा कठोर पाऊले उचलावी लागतात. त्यामुळे लोकांच्या मनात पोलिसांची प्रतिमा खराब कधीकधी मलिन देखील होते.

पण जर्मनीच्या एका महिला पोलीस अधिकारी अॅड्रिएन कोलेझर यांना लोक केवळ चांगले मानत नाहीत तर त्यांच्यावर खूप प्रेमही करतात. याचे कारण म्हणजे कोलेझर अतिशय ग्लॅमरस असून, त्यांचे सौंदर्य अनेक तरुणांना भुरळ घालते.

Adrienne Koleszar
Adrienne KoleszarDainik Gomantak
Adrienne Koleszar
Rishi Sunak Latest News: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खास संदेश देत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

अॅड्रिएन कोलेझर त्यांच्या कामात अतिशय तरबेज आणि चोख आहेत. कारवाई करताना तसेच, काही चुकीचे आढळून आल्यास कडक पवित्रा घेण्यास त्या कोणतीही कुचराई करत नाहीत. त्यामुळे बोल्ड असल्यातरी त्यांची सोशल मीडियावर लेडी सिंघम अशी ओळख आहे.

'द आयरिश सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अॅड्रिएन यांनी अलीकडे एका मुलाखतीत खुलासा केला होता की, अनेक वेळा गुन्हेगारच नव्हे तर निरपराध लोक देखील, तिचे चाहते आहेत. त्यामुळे अनेकवेळा लोक त्यांना मला अटक करा अशी विनंती करतात. सोशल मीडियावर देखील अनेक लोक अशी विनंती करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com