Trending News: तुम्ही आजपर्यंत अनेक विचित्र किस्से ऐकले असतील, पण जेव्हा 1 हजार लोक एका ठिकाणी जमतात आणि अचानक विचित्र गोष्टी करायला लागतात तेव्हा काय होते? होय, असाच काहीसा प्रकार जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये घडला आहे.
वास्तविक, जर्मनीतील पॉट्सडॅमर प्लॅट्झ रेल्वे स्टेशनवर सुमारे 1 हजार लोक जमले आणि त्यानंतर त्यांनी कुत्र्यासारखे वागणे आणि भुंकणे सुरु केले. इतकंच नाही तर ते एकमेकांशी फक्त भुंकूनच बोलताना दिसत होते.
हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले लोक अचंबित झाले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याचे कारण विचारत आहेत.
बर्लिनमधील (Berlin) या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या लोकांमध्ये कुत्र्याचा आत्मा शिरल्याचा भास होत आहे. ते अचानक कुत्र्यासारखे वागू लागले आणि भुंकायला लागले.
घटनेच्या वेळी या लोकांनी त्यांच्या चेहऱ्यावर कुत्र्याचे मास्क घातले होते. या लोकांना कुत्र्यांसारखे वागताना ज्या कोणी पाहिले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण विचारत आहे की, हे लोक असे का करत आहेत? डेली मेलच्या वृत्तानुसार, या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे वागणे माणसासारखे वाटत नाही.
काही दिवसांपूर्वी जपानमधूनही (Japan) असेच एक प्रकरण समोर आले होते. वास्तविक, तिथे टोको नावाच्या व्यक्तीने लाखो रुपये खर्च करुन कुत्रा बनला होता. त्याला कुत्र्यांसारखे जीवन आवडते असेही त्याने सांगितले होते. कुत्रा बनण्याचे त्याचे स्वप्न होते आणि त्याने ते पूर्ण केले.
विशेष म्हणजे, टोकोने यासाठी खास पोशाख बनवला होता आणि तो परिधान करताना तो कुत्र्यासारखी कृती करताना दिसला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.