Marlene Schiappa: खळबळजनक! प्लेबॉय मॅगझिनच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाला फ्रान्सच्या महिला मंत्र्याचा फोटो

फ्रेंच मंत्रिमंडळातील सामाजिक आर्थिक आणि फ्रेंच असोसिएशन अफेअर्स मंत्री आहेत.
Marlene Schiappa
Marlene SchiappaDainik Gomantak
Published on
Updated on

फ्रान्सच्या मंत्री मार्लेन शियप्पा यांच्या एका छायाचित्राने जगभरात खळबळ उडाली आहे. मार्लेन यांचा फोटो प्लेबॉय मासिकाच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध झाला आहे. या चित्रावरून एवढा गदारोळ झाला की, खुद्द फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांना पुढे येऊन टीका करावी लागली.

मार्लिन, फ्रेंच मंत्रिमंडळातील सामाजिक आर्थिक आणि फ्रेंच असोसिएशन अफेअर्स मंत्री आहेत. मार्लेन स्वत:ची ओळख सॅपिओसेक्सुअल म्हणून करतात, त्यांनी मासिकाला 12 पृष्ठांची मुलाखत देखील दिली आहे.

मार्लेन यांनी दिलेल्या मुलाखतीत गर्भपात, महिलांचे अधिकार आणि एलजीबीटी अधिकार यासारख्या विषयांवर भाष्य केले आहे. प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर दिसणाऱ्या मर्लिन या पहिल्या महिला नेता आहेत. मार्लिनचे हे चित्र प्लेबॉय मासिकाच्या फ्रान्स आवृत्तीत प्रकाशित होणार आहे.

फ्रान्समध्ये सध्या निवृत्तीचे वय वाढवण्यासाठी निदर्शने सुरू आहेत. अशात मार्लिन यांचे प्लेबॉयच्या कव्हर पेजवर दिसणे योग्य नाही. यामुळे प्रकरण आणखी बिघडू शकते. असे मंत्रिमंडळाशी संबंधित काही लोकांचे मत आहे.

प्लेबॉय कव्हर फोटोवरून झालेल्या गदारोळानंतर मार्लिन यांनी ट्विट करून आपली बाजू मांडली आहे. महिलांना त्यांच्या शरीरावर पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते त्यांच्या शरीरासोबत वाट्टेल ते करायला फ्री आहेत. फ्रान्स मध्ये महिला मुक्त आहेत. दांभिक किंवा पुराणमतवादी विचारसरणीच्या लोकांना त्रास होत असला तरी तो विचार चालूच राहिला पाहिजे.

Marlene Schiappa
US Storm Video: अमेरिकेच्या 11 राज्यांमध्ये वादळाचा कहर, 32 जणांचा मृत्यू

या प्रकरणावरून वाद वाढल्यानंतर प्लेबॉयने स्वत:चा बचाव करत, मार्लिन या फोटोशूटसाठी योग्य व्यक्ती होत्या कारण त्या महिलांच्या हक्कांशी संबंधित आहे. हे मासिक केवळ पुरुषांसाठी नसून ते स्त्रीवादी कारणासाठी एक माध्यम बनू शकते हे तिला चांगलेच समजते.

प्लेबॉय हे सॉफ्ट पॉर्न मॅगझिन नसून 300 पानांचे त्रैमासिक मासिक असल्याचे मॅगझिनने म्हटले आहे. अर्थात, मासिकाच्या काही पृष्ठांवर नग्न स्त्रियांची चित्रे आहेत, परंतु बहुतेक पृष्ठांवर असे होत नाही.

मार्लिन 40 वर्षांच्या आहेत, 2017 मध्ये त्या फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या मंत्रिमंडळात सामील झाल्या. त्या दोन मुलांच्या आई आहेत. ती एक लेखिकाही आहे. त्यांनी 28 हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. स्वत:ला स्त्रीवादी म्हणवणाऱ्या मार्लिन यांनी अनेकदा आक्रमकपणे महिलांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली आहे.

लैंगिक समानता मंत्री म्हणून 2017 मध्ये त्या पहिल्यांदा फ्रेंच मंत्रिमंडळात सामील झाल्या. यापूर्वीही त्या अनेकदा वादात सापडली आहे. पण यावेळी फ्रेंच मंत्रिमंडळानेच त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com