WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Knuckles Madsen Shot Dead: WWE च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. माजी स्टारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
Knuckles Madsen Shot Dead
Knuckles Madsen Shot DeadDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

WWE सध्या 'सॅटरडे नाईट मेन इव्हेंट' आणि 'इव्होल्यूशन' या दोन मोठ्या शोची तयारी करत असताना एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. माजी WWE स्टार नकल्स मॅडसन ऊर्फ केविन निकेल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची दु:खद माहिती समोर आली आहे. ही घटना अमेरिकेतील रॉजर्स, अर्कांसस येथे घडली असून या प्रकरणाने संपूर्ण कुस्ती विश्व हादरले आहे.

ही दु:खद बातमी सर्वप्रथम डॉग पाउंड रेसलिंग आणि NWA टेक्सास या दोन स्वतंत्र कुस्ती संस्थांनी त्यांच्या सोशल मीडियावर दिली. त्यांनी केविन निकेलच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटले की, "व्यावसायिक कुस्ती क्षेत्रातील त्याचे योगदान अमूल्य होते. आम्ही सदैव त्याला स्मरू."

Knuckles Madsen Shot Dead
Goa Education: गोव्यात आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा! कुणीही होणार नाही 'नापास'; नवे धोरण लागू नाही

केविन निकेल यांनी २०१२ ते २०१३ या काळात WWE NXT मध्ये काम केले होते. त्यांनी काही नामांकित कुस्तीपटूंविरुद्ध सामन्यांत आपली ठसा उमठवणारी कामगिरी सादर केली होती. WWE मधून बाहेर पडल्यानंतरही त्याने स्वतंत्र कुस्ती स्पर्धांमध्ये आपली कारकीर्द सुरू ठेवली आणि देशभर विविध स्पर्धांमध्ये भाग घेत प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या १८ वर्षांच्या कुस्ती कारकीर्दीत त्यांनी खूप सन्मान आणि चाहत्यांचे प्रेम मिळवले होते.

Knuckles Madsen Shot Dead
Goa Film Festival: गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला सेलिब्रिटींची मांदियाळी! अक्षय कुमारची उपस्थिती; मोहन आगाशे यांचा सन्मान

बेंटन काउंटीच्या शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केविन निकेल यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि पोटातून प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा निकेल गंभीर अवस्थेत होते आणि तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सध्या हत्या कोण आणि का केली याचा तपास सुरू असून, कोणत्याही संशयिताची ओळख पटलेली नाही. पोलीस विविध अंगांनी तपास करत असून लवकरच अधिक माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dead body found in canal in Sindhudurg
Indian Expat Murdered In Sharjah UAE
Hafiz Saeed Close Aide Shot Dead Karachi
Guwahati Crime News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com