Former Tunisian PM Ali Laarayedh: ट्युनिशियाचे माजी पंतप्रधान अली लारायेद यांना 34 वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Tunisia’s Ex-PM Ali Larayedh Jailed for 34 Years: ट्युनिशियाचे माजी पंतप्रधान आणि एन्नाहदा इस्लामी चळवळीचे उपप्रमुख अली लारायेद यांना दहशतवादाशी संबंधित गंभीर आरोपांवरुन तब्बल 34 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Tunisia’s Ex-PM Ali Larayedh Jailed for 34 Years
Tunisian PM Ali LaarayedhDainik Gomantak
Published on
Updated on

ट्युनिशियाचे माजी पंतप्रधान आणि एन्नाहदा इस्लामी चळवळीचे उपप्रमुख अली लारायेद यांना दहशतवादाशी संबंधित गंभीर आरोपांवरुन तब्बल 34 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्यासह आणखी आठ जणांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे, अशी माहिती ट्युनिशियाच्या अधिकृत वृत्तसंस्था टीएपीने शनिवारी (3 मे) दिली.

टीएपीच्या वृत्तानुसार, लारायेद आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर "दहशतवादी संघटना स्थापन करण्यात सहभाग घेणे, देशांतर्गत अशा संघटनांमध्ये सामील होणे आणि ट्युनिशियातील तरुणांना दहशतवादी गटांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशात पाठवणे, अशा आरोपांखाली खटला दाखल करण्यात आला होता. हा खटला ट्युनिशियामध्ये "मानवी तस्करी खटला" म्हणून ओळखला गेला.

Tunisia’s Ex-PM Ali Larayedh Jailed for 34 Years
Taliban Attack Pakistan: तालिबानचा पाकिस्तानवर हल्ला; विविध भागात बॉम्बचा वर्षाव

दरम्यान, या खटल्यातील सर्व आरोपींवर इस्लामिक स्टेट (दाएश/आयएसआयएस) या दहशतवादी (Terrorist) संघटनेशी संबंधित भागात तरुणांची तस्करी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने 18 ते 36 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा जाहीर केली. या शिक्षेमुळे ट्युनिशियातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bashar Al Assad Death Sentence Syria Court
Goa High Court Premature Release
Sexual Assault Case
Firozabad Toddler Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com