पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान (Prime Minister) नवाज शरीफ (Nawaj Sharif) यांच्या मालकीच्या 11 एकर जागेचा लिलाव झाला असून, ही जमीन 11.2 कोटी पाकिस्तानी रुपयांना विकली गेली असल्याचे समजते आहे. तोशाखाना प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्यामुळे इस्लामाबाद (Islamabad) उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2020 मध्ये नवाज शरीफ याना न्यायालयाने गुन्हेगार घोषित केले होते. त्यानंतर इस्लामाबाद कोर्टाने नॅशनल अकाउंटेबलिटी ब्युरोला (National Accountability Bureau) शरीफ यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास परवानगी दिली होती. (Former Pakistani Prime Minister Nawaz Sharif's property auctioned)
न्यायालयाने पाकिस्तानच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला (SEP) शरीफ यांच्या विविध व्यवसायात गुंतलले शेअरस विकण्याचे सुद्धा आदेश दिले आणि त्यातून मिळालेला पैसा सरकारी तिजोरीत जमा करण्यास सांगितले असल्याचे समजते आहे. पाकिस्तानच्या पंजाब सरकारच्या प्रवक्त्यांनी "कोर्टाने शरीफ यांच्या 88.4 कनाल (11एकर) जमिनीचा ११.२ करोड रुपयांत लिलाव केला आहे." ही जागा लाहोर पासून 80 किमी दूर आहे.
किमान किंमत प्रति एकर 70 लाख रुपये निश्चित केली गेली असून शरीफ यांच्या इतर संपत्तीचाही सरकार लिलाव करणार असल्याची माहिती मिळाली आहे. लिलावादरम्यान इतर सहा जणांनीही या जागेवर हक्क सांगितला आणि महसूल अधिकाऱ्यांना लिलाव रोखण्याचे आवाहन केले, परंतु त्यांनी ते नाकारले. तर दावेदार अशरफ मलिक यांनी सांगितले की, त्यांनी 29 मे 2019 रोजी शरीफ यांच्याकडून 7.5 कोटी रुपयांमध्ये ही जमीन आपण खरेदी केली होती. तर पैसे बँकिंग माध्यमाद्वारे देण्यात आले होते, परंतु शरीफ यांना अटक झाल्यानंतर लंडनला हलविण्यात आले असल्याने जमीन आपल्या नावे होऊ शकली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.