

Former IPL Chairman Lalit Modi Gets British Citizenship: इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक, भारताचे माजी आयपीएल चेअरमन आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली देश सोडून पळून गेलेले ललित मोदी यांना आता ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले. आज 15 नोव्हेंबरच्या सकाळी ललित मोदींनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर करत ब्रिटनचे नागरिकत्व मिळाल्याची घोषणा केली.
त्याआधी 14 नोव्हेंबर रोजी शनिवारच्या दिवशी ऑक्सफर्ड युनियनला संबोधित करताना त्यांनी ब्रिटनला आपले स्थायी घर म्हणून घोषित करत नागरिकत्व मिळाल्याचा खुलासा केला होता. परिवार आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात त्यांना हे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. ब्रिटनमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असलेले मोदी आता अधिकृतपणे तिथले नागरिक बनले असून, हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत गौरवान्वित करणारा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले.
'एक्स' वरील आपल्या पोस्टमध्ये ब्रिटनच्या संस्कृतीची प्रशंसा करताना ललित मोदींनी सांगितले की, ब्रिटनची संस्कृती त्यांच्या मनाला भिडली असून, तिथल्या संस्था आणि परंपरांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. ब्रिटनचे (Britain) नागरिक बनणे ही केवळ सन्मानाची नाही तर एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे, जी ते पूर्ण अभिमानाने स्वीकारत आहेत. भविष्यात आपल्या या नवीन घराच्या विकासासाठी सकारात्मक योगदान देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
किंग चार्ल्स तृतीय यांच्या जन्मदिवसाच्या मुहूर्तावर ब्रिटिश नागरिकता मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी ‘गॉड सेव द किंग’ असेही लिहिले. विशेष म्हणजे, ललित मोदींनी 2008 मध्ये भारतात बहुचर्चित टी-20 क्रिकेट स्पर्धा आयपीएलची सुरुवात केली आणि ते त्याचे पहिले चेअरमनही राहिले. मात्र, 2010 मध्ये आर्थिक अनियमितता आणि फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर ते भारत सोडून लंडनला पळून गेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.