जेम्स बाँडची भूमिका साकारणारा डॅनिएल क्रेग अन् माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना 'नाइटहूड'

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर (Tony Blair) यांना महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते नाइटहूडने सन्मानित करण्यात आले आहे.
Tony Blair


Tony Blair

Dainik Gomantak 

Published on
Updated on

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना महाराणी एलिझाबेथ द्वितीय (britain's Queen Elizabeth II) यांच्या हस्ते नाइटहूडने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानानंतर माजी पंतप्रधान सर टोनी (Tony Blair) झाले. त्यांना ऑर्डर ऑफ द ग्रेटरचा सन्मानित करण्यात आला आहे. हा इंग्लंडचा सर्वात जुना आणि सर्वात श्रेष्ठ सन्मान आहे, जो सम्राटाच्या स्वच्छेने प्रदान केला जातो. 1348 मध्ये स्थापन झालेला हा सन्मान महत्त्वाची नागरी सेवा म्हणून ओळखला जातो. 1997 ते 2007 दरम्यान 10 वर्षे लेबर पार्टीचे (Labor Party) पंतप्रधान म्हणून काम केलेले ब्लेअर म्हणाले, "हा एक मोठा सन्मान आहे. ज्यांनी माझ्यासोबत राजकारण, सार्वजनिक सेवा आणि समाजाच्या तळागाळापर्यंत सेवा केली त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.

दरम्यान, सन्मानित करण्यात येणार्‍या इतर सेलिब्रिटींमध्ये चित्रपटांमध्ये काल्पनिक जेम्स बाँडची भूमिका करणारा अभिनेता डॅनिएल क्रॅग, कॅमिला, किशोर टेनिस स्टार एम्मा रडुकानू, हाऊस ऑफ लॉर्ड्स सदस्य बॅरोनेस व्हॅलेरी आमोस आणि भारतीय वंशाचा अभिनेता नितीन गणात्रा यांचा समावेश आहे. ब्रिटनचे वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रमुख, इंग्लंडचे उप-वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिट्टी आणि जोनाथन व्हॅन-टॅम यांनाही नाइटहूडने सन्मानित करण्यात आले.

<div class="paragraphs"><p><br>Tony Blair</p></div>
रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची केली चाचणी

सुमारे 50 भारतीय वंशाच्या व्यावसायिक, उद्योजकांचा गौरव

अजय कुमार कक्कर, भारतीय वंशाचे ब्रिटिश शिक्षणतज्ञ आणि हाउस ऑफ लॉर्ड्सचे प्रमुख सदस्य, यांना नाईट कमांडर म्हणून ऑर्डर ऑफ द ब्रिटिश अंपायर (KBE) ने सन्मानित करण्यात आले आहे. सुमारे 50 भारतीय वंशाच्या व्यावसायिक, विविध क्षेत्रातील उद्योजकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. UK मधील या वर्षीच्या सन्मानितांच्या यादीमध्ये शास्त्रज्ञ, अभिनेते, राजकारणी, ऑलिम्पिक खेळाडू आणि धर्मादाय संस्थांसह 1,200 हून अधिक लोकांना मान्यता देण्यात आली आहे.

अभिनेता डॅनिएल क्रेग, जेम्स बाँड म्हणून प्रसिद्ध

नो टाइम टू डाय हा बाँड मालिकेतील 25 वा चित्रपट होता आणि जेम्स बाँड म्हणून डॅनियल क्रेगचा शेवटचा चित्रपट होता. या मालिकेत डॅनियल क्रेगची एंट्री 2006 मध्ये आलेल्या रॉयल कॅसिनो चित्रपटातून झाली होती. तेव्हापासून डॅनियल जेम्स बाँड बनत होता. डॅनियल बाँड 2008 मध्ये क्वांटम ऑफ सोलेस, 2012 मध्ये स्कायफॉल आणि 2015 मध्ये स्पेक्टरमध्ये दिसले. नो टाईम टू डायची कथा स्पेक्ट्रच्या अनेक वर्षांनी सेट झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com