प्लॅस्टिकचे लहान कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक होय. हे प्रदूषणाचा एक प्रमुख स्त्रोत असून मानवी रक्तात प्रथमच मायक्रोप्लास्टिक (Microplastics In Human Blood) आढळून आले आहेत.80 टक्के लोकांच्या रक्तात प्लॅस्टिकचे बारीक कण दिसून आले आहे. हे बारीक कण शरीराच्या एक अवयवामधून दुसऱ्या अवयवामध्ये जाऊ शकते किंवा शरीराच्या एकाच भागात राहू शकते, अशी माहिती संशोधनातून (Research) समोर आली आहे. त्यामुळे संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.
प्रयोगशाळेमध्ये मानवी शरीरावर प्रयोग केले असता हे मायक्रोप्लास्टिक (Microplastics) शरीरासाठी घातक असल्याचे दिसून आले आहे. परंतु मानवी रक्तातील मायक्रोप्लास्टिकमुळे आरोग्यावर (Health) कोणता परिणाम होणार? याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
मायक्रोप्लास्टिक हे शिखर माऊंट एव्हरेस्ट आणि सर्वात खोल समुद्रापर्यंत पोहोचला आहे. मानवी शरीरात प्लॅस्टिकचे बारीक कण आहेत का? याचा शोध संशोधकानी केला. त्यानंतर 22 लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. हे नमुने लहान मूल आणि वयस्कर लोकांचे होते. यामध्ये 17 नामुन्यामध्ये प्लॅस्टिक आढळून आले. यापैकी काही नामुन्यांमध्ये मद्य आणि कोल्ड ड्रिंक्ससाठी (Cold Drink) परण्यात येणार PET प्लॅस्टिक आढळून आले. याशिवाय फूड पॅकिंगसाठी (Food Packing) वापरण्यात येणारे प्लॅस्टिक एक तृतीयांश नामुन्यांमध्ये आढळून आले. आपल्या शरीरात प्लॅस्टिक आहे हे संशोधनातून लक्षात आले आहे, असे संशोधक प्राध्यापक डिक वेथाक यांनी सांगितले. पण, याबाबत अधिक संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.