Kuwait Building Fire: कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; 5 भारतीयांसह 35 जणांचा मृत्यू

Kuwait Building Fire: कुवेतमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुवेतच्या मंगफ शहरात बुधवारी एका इमारतीला भीषण आग लागली.
Kuwait Building Fire
Kuwait Building FireDainik Gomantak

Kuwait Building Fire: कुवेतमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुवेतच्या मंगफ शहरात बुधवारी एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 5 भारतीयांसह 35 जणांचा मृत्यू झाला आहे. कुवेतच्या अधिकृत वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. बुधवारी सकाळी आग लागली. इमारतीतून ज्वाळा उठताना दिसत आहेत. काही वेळातच आग बहुमजली इमारतीच्या अनेक मजल्यापर्यंत पोहोचली. या अपघातात मृत्युमुखी पडलेले 5 भारतीय हे केरळचे रहिवासी आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून आग कशामुळे लागली याचा शोध घेत आहोत, असे कुवेतच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक वेळेनुसार पहाटे चार वाजता इमारतीला आग भीषण लागली. यावेळी लोक साखर झोपेते होते, त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास वेळ लागला. औद्योगिक प्लांटमध्ये काम करणारे लोक या इमारतीत राहतात. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत मोठ्या संख्येने मल्याळी भाषिक लोक राहतात. आग इतकी भीषण होती की, अनेकांनी घाबरुन खिडक्यांमधून खाली उड्या मारल्या. जीव वाचवण्याच्या या प्रयत्नातही त्यांना गंभीर इजा झाली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सुमारे 43 जण जखमी झाले आहेत.

Kuwait Building Fire
Kuwait Emir Passed Away: कुवेतचे अमीर शेख नवाफ यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

अग्निशमन दल आणि पोलिसांनी पी़डितांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com