World Happiness Report: फिनलॅंडने मारली पुन्हा बाजी; अफगाणिस्तान ठरला सर्वात नाखूश देश,भारत...

World Happiness Report: अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या 137 व्या स्थानावर येऊन सर्वात नाखूश देश ठरला आहे.
World Happiness Report
World Happiness ReportDainik Gomantak
Published on
Updated on

World Happiness Report: युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन नेटवर्कने जागतिक आनंद दिवसाच्यानिमित्ताने वार्षिक हॅप्पीनेस रिपोर्ट जारी केला आहे. 150 पेक्षा जास्त देशांचा अभ्यास करुन हा अहवाल प्रसिद्ध केला जातो.

या अहवालानुसार, फिनलॅंडने सलग सहाव्यांदा सर्वात आनंदी देश म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे तर अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या 137 व्या स्थानावर येऊन सर्वात नाखूश देश ठरला आहे.

भारताने आपल्या रॅंकमध्ये सुधारणा करत 125 व्या क्रमाकांवर उडी मारली आहे. 2021 मध्ये 139 व्या क्रमांकावर तर 2022 मध्ये 136 व्या क्रमांकावर भारत होता. 2022मध्ये 146 देशांचा अहवाल प्रसिद्ध केला होता.

भारताचे शेजारी देश पाकिस्तानने 108 व्या क्रमांकावर , म्यानमार 72 व्या क्रमांकावर, नेपाळ 78 व्या क्रमांकावर , बांग्लादेश 102 व्या क्रमांकावर , चीन 64 व्या क्रमांकावर आहेत.

सगळ्यात कमी आनंदी देशामध्ये आफगानिस्तानबरोबर लेबनान, जिम्बॉब्वे, द डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो हे देश आहेत. या देशात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याचबरोबर, दीर्घायुष्य जगण्याची आशा दिसून येत नाही.

World Happiness Report
Elon Musk On Natu Natu: "टेस्ला कार नाचल्या नाटू नाटूच्या तालावर" आता एलॉन मस्क यांचं ट्विट चर्चेत

दरम्यान, जागतिक आनंदी अहवाल हा जीडीपी, स्वातंत्र्य, जीवन जगण्यासाठीचे इतर परिणाम, भ्रष्टाचार , सोशल रिपोर्ट या सगळ्याचा विचार करुन, त्याचा अभ्यास करुन बनवला जातो.

जगात सगळ्यात जास्त वेगाने वाढणाऱी अर्थव्यवस्था म्हणून भारता( India )च्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. तरीही आर्थिक परिस्थिती कमजोर असणाऱ्या आणि जे देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत त्या देशांच्यापेक्षा भारताचा क्रमांक कसा असा अनेकजण प्रश्न विचारत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com