वित्त मंत्रालयात कंत्राटावर काम करणाऱ्या एकाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गाझियाबाद पोलिसांनी नवीन पाल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. केंद्रीय एजन्सी आयबीने याबाबत इनपुट दिले होते.
पालने अनेक महत्त्वाची कागदपत्रे कराचीतील अर्थ मंत्रालय खात्याला पाठवली. तसेच, G-20 बैठकीशी संबंधित अनेक महत्त्वाची माहितीही पाठवली. अशी माहिती समोर आली आहे.
इंडिया टुडेच्या अरविंद ओझा यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, नवीन पाल यांच्यावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारतातील अनेक गुप्तचर माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेल्या नवीन पालची गाझियाबाद पोलीस आणि आयबीचे अधिकारीही चौकशी करत आहेत. नवीन पाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजली नावाच्या तरुणीच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे,
नवीन व्हॉट्सअॅपवर तरुणीशी बोलू लागला. व्हॉट्सअॅपचा हा आभासी क्रमांक बरेलीचा होता. मात्र नंतर ते पाकिस्तानातील कराचीतून कोणीतरी चालवत असल्याचे आढळून आले. या क्रमांकाचा आयपी पत्ता कराचीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नवीनच्या मोबाईल फोनमधून अर्थ मंत्रालय आणि जी-20 ची कागदपत्रेही सापडली आहेत. या प्रकरणात अलवरमधील एक महिलाही आयबीच्या रडारवर आहे. त्याच्या पेटीएममधून नवीनच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत.
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, गाझियाबादमध्ये काम करणारा नवीन पाल कंत्राटी पद्धतीने वित्त मंत्रालयात एमटीएस म्हणून कार्यरत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो एका संशयित महिलेच्या संपर्कात आला आणि तिच्याशी महत्त्वाची सामरिक माहिती सामायिक केली ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि हितसंबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडावा-उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची झडती घेतली असता त्याने गुप्त नावाने सेव्ह केलेल्या नंबरवर अनेक गोपनीय कागदपत्रे पाठवली होती. त्याचा बॅकअप घेतल्यावर असे आढळून आले की त्यात भारतीय वित्त मंत्रालय, G20 सह अनेक गोपनीय कागदपत्रे पाठवण्यात आल्याचे आढळून आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.