Facebook Controversy: विनाकारण अकाऊंट बंद करणं फेसबुकला चांगलंच महागात पडलं आहे. अकाऊंट बंद केल्यानंतर या व्यक्तीने फेसबुकविरोधात खटला दाखल केला होता. केस जिंकल्यानंतर आता फेसबुकला या व्यक्तीला 50 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 41,11,250 रुपये भरपाई द्यावी लागणार आहे.
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, फेसबुकने (Facebook) कोलंबसचे रहिवासी जेसन क्रॉफर्डचे फेसबुक अकाऊंट बंद केले होते. जेसन क्रॉफर्डच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याचे फेसबुक अकाऊंट बंद होते. त्याला त्याच्या फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करता आले नाही. त्याच्या फेसबुक अकाऊंटवर अनेक पर्सनल फोटोंची स्टोरी होती.
जेसनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या अकाऊंटवर असे लिहिले होते की, त्याचे फेसबुक अकाऊंट नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बॅन करण्यात आले आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकांनी फेसबुकची मूळ कंपनी मेटाशी संपर्क साधला आहे. पण त्यांच्या मेसेजला कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर आले नाही.
दरम्यान, फेसबुकने त्याच्या मेसेजला प्रतिसाद न दिल्याने नाराज झालेल्या जेसनच्या म्हणण्यानुसार, त्याने 2022 मध्ये कंपनीच्या निष्काळजीपणासाठी खटला दाखल केला. खटला दाखल करुनही फेसबुककडून प्रतिसाद मिळाला नाही.
या प्रकरणात, न्यायाधीशांनी मेटाला 50 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 41,11,250 रुपये भरपाईचे आदेश दिले. यानंतर त्याला कंपनीकडून समजले की, त्याचे अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे.
जेसनच्या मते, हे प्रकरण अजून संपलेले नाही. कारण फेसबुक न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करत नाही. फेसबुकने अजून एक डॉलरही भरलेला नाही.
या प्रकरणाची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा होत आहे. कंपनीने कोणतेही कारण नसताना अकाऊंट बंद करु नये, असे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. आजकाल वापरकर्त्यांच्या अकाऊंटमध्ये त्यांचा पर्सनल डेटा खूप मोठ्याप्रमाणात असतो. यामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.