फेसबुकनं बदललं नाव,या फीचर्ससह येणार नव्या रूपात

Facebook सध्या एक "मेटाव्हर्स" नावाचे फिचर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे
Facebook announce new name Meta company will launch Metaverse feature
Facebook announce new name Meta company will launch Metaverse feature Twitter
Published on
Updated on

जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने (Facebook) आपल्या कंपनीचे नाव बदलून आता 'मेटा' (Meta) केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत होती. Facebook सध्या एक "मेटाव्हर्स" (Metaverse) नावाचे फिचर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, जो मुळात एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म (Online Platform) असणार आहे जिथे लोक आभासी वातावरणात संवाद साधण्यासाठी विविध फीचर्स वापरू शकतात. हे पूर्ण करण्यासाठी, कंपनीने व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीमध्ये देखील मोठी गुंतवणूक केली आहे.(Facebook announce new name Meta company will launch Metaverse feature)

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी जाहीर केले आहे की कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून "मेटाव्हर्स कंपनी" बनणार आहे आणि "एम्बेडेड इंटरनेट" वर काम करेल, रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे तीच राहणार असल्याचे देखील कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी फेसबुकने 2005 मध्येही आपले नाव बदलले होते.कंपनीने त्यावेळी आपले नाव TheFacebook वरून Facebook असे केले होते. सध्या जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ४१ कोटी इतकी आहे.

Facebook announce new name Meta company will launch Metaverse feature
हिरोशिमा अणु हल्ल्यातून वाचलेले सुनाओ त्सुबोई यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन

याआधी फेसबुकने जाहीर केले होते की कंपनीला सोशल नेटवर्क मेटाव्हर्स करण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल. यासाठी 10,000 लोकांना कामावर ठेवण्याची घोषणा फेसबुककडून करण्यात आली होती. नवीन मेटाव्हर्समध्ये, फेसबुक आभासी आणि संवर्धित वास्तवाचा वापर करेल आणि कंपनी आभासी अनुभवांचा एक नवीन अध्याय सुरू करेल.

अशातच ऑनलाइन सुरक्षिततेबाबत अनेक देशांमध्ये फेसबुकवर प्रश्न उपस्थित होत असताना आणि फेसबुकचाय कन्टेन्ट बाबतही चर्चा होत असतानाच फेसबुकने आपले हे नाव बदलले आहे. भारत सरकारने देखील याबाबत फेसबुकला एक पत्र पाठवून सोशल मीडिया कंपनीने वापरलेल्या अल्गोरिदम आणि प्रक्रियांचा तपशील मागवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com