परराष्ट्र मंत्र्यांचे म्युझिक कनेक्शन! Spotify वर ऐकायचे अमेरिकन अल्बम

मी ऐकलेला पहिला परदेशी संगीत अल्बम द हिटमेकर्स हा अमेरिकन अल्बम होता.
External Affairs Minister S Jaishankar was listen American album on Spotify
External Affairs Minister S Jaishankar was listen American album on SpotifyDainik Gomantak
Published on
Updated on

वॉशिंग्टन: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( External Affairs Minister S Jaishankar ) आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन (Antony Blinken) यांनी मंगळवारी हार्वर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात हजेरी लावली. यादरम्यान जयशंकर आणि अँटोनी ब्लिंकन अमेरिकन विद्यार्थ्यांच्या एका गटाला भेटले. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांशी संवादही साधला. एस जयशंकर यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांसोबत परदेशातील त्यांच्या आवडीबद्दल शेअर केल्या.

External Affairs Minister S Jaishankar was listen American album on Spotify
युक्रेनमध्ये 'नरसंहार' केल्याचा बायडन यांचा पुतीनवर आरोप

2019-2020 ग्लोबल सिटीझन इयर इंडिया फेलो आणि आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यास करणारा विद्यार्थी, एंजल ब्रायन यांनी या दोन नेत्यांना अक प्रश्न विचारला, तुम्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये कधी इंट्रेस्ट घेण्यास सुरुवात केली? यावर भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, मला वाटते की यामागील एक विशेष कारण म्हणजे माझी पाश्चिमात्य संगीतात असलेली रुची असावी. जेव्हा तुम्ही स्वतःच्या सांस्कृतिक परंपरेपरेच्या बाहेर जाऊन संगीत ऐकता आणि मग तुम्ही त्याबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला कळते की, संगीताचे किती प्रकार आहेत, कसे प्रकार आहेत, किती लोक यात तज्ञ आहेत. यावेळी जयशंकर यांनी या सर्व संगीत क्षेत्राशी संबधीत गोष्टी विद्यार्थ्यांना सांगत होते. त्यांना परदेशी संगीतात किती रस आहे तो अनूभव कसा होता याबद्दल जयंशंकर विद्यार्थ्यांशी बोलत होते.

जयशंकर म्हणाले की, मी ऐकलेला पहिला परदेशी संगीत अल्बम द हिटमेकर्स हा अमेरिकन अल्बम होता. मी स्पॉटीफायवर संगीत ऐकायचो. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रस आहे पण जेव्हा शाळेत किंवा विद्यापीठात काही वेगळी घटना घडते तेव्हा खऱ्या अर्थाने उत्साह वाढतो. या सर्व गोष्टींनी मला प्रेरणा दिली आहे.

External Affairs Minister S Jaishankar was listen American album on Spotify
युक्रेनचे विरोधी पक्षनेते गुप्तचर यंत्रणेच्या कारवाईत गजाआड

दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन म्हणाले की, देशाची राजधानी वॉशिंग्टन येथे स्थित प्रतिष्ठित संशोधन विद्यापीठ 'हॉवर्ड युनिव्हर्सिटी'ने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत-अमेरिका 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेच्या एका दिवसानंतर, ब्लिंकेन आणि भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी दोन्ही देशांमधील शैक्षणिक संबंध मजबूत करण्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी याच हार्वर्ड विद्यापीठातूनच शिक्षण घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com