Elon Musk: मस्कचं पुन्हा फिरलं डोकं,150 कोटी ट्विटर अकाऊंट्स होणार डिलीट!

Elon Musk: टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरचे $ 44 अब्जमध्ये अधिग्रहण केल्यानंतर, ते सतत धक्कादायक गोष्टी करत आहेत.
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

Elon Musk: टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरचे $ 44 अब्जमध्ये अधिग्रहण केल्यानंतर, ते सतत धक्कादायक गोष्टी करत आहेत. आधी त्यांनी एका झटक्यात हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. यानंतर त्यांनी कार्यालयात येणाऱ्या किंवा कार्यालयात पोहोचणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी परत जावे, असा ई-मेल संदेश पाठवला. अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याने त्यांच्यावर जगभरातून टीका झाली होती. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते की, आगामी काळात आपल्याला ट्विटर 2.0 बनवायचे आहे.

Elon Musk
Elon Musk: खुली कारही नाही सेफ, कोणीही मारेल गोळी, जगातील श्रीमंत व्यक्तीलाही जीवाची भीती

एलन मस्क यांचे धक्कादायक ट्विट

आता एलन मस्क (Elon Musk) यांनी आणखी एक धक्कादायक ट्विट केले आहे. कंपनी लवकरच 1.5 अब्ज (150 कोटी) ट्विटर अकाउंट डिलीट करणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या या पाऊलामुळे 150 कोटी अकाऊंट्स डिलीट होणार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले की, कंपनीच्या या प्रक्रियेअंतर्गत अशी खाती हटवली जातील, ज्यावरुन कोणतेही ट्विट केले गेले नाही किंवा ते वर्षानुवर्षे लॉग इन झाले नाहीत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट काढून घेतला

ट्विटर (Twitter) स्पेसमध्ये अशी अनेक खाती आहेत, जी बनवल्यानंतर यूजर्सने एकदाच लॉग इन केले आहे. त्याचबरोबर अशी अनेक खाती देखील आहेत, ज्यातून एकही ट्विट पोस्ट केले गेले नाही आणि ते वर्षानुवर्षे लॉग इन केलेले नाहीत. यूजर्सने पासवर्ड विसरुन दुसरे खाते तयार केल्याचीही अशी प्रकरणे समोर आली आहेत. दुसरीकडे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुटही एलन मस्क यांच्याकडून गेला आहे.

Elon Musk
अबब! Elon Musk च्या चाहत्यांनी उभारला 30 फूट लांब ॲल्युमिनीअमचा पुतळा, वाचा कारण एका क्लिकवर

मस्कची संपत्ती $185 अब्ज झाली

फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनेअर इंडेक्समध्ये बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती $186.2 बिलियन झाली आहे. त्याचवेळी, एलन मस्क यांची मालमत्ता 185 अब्ज डॉलर्स आहे. दुसरीकडे, ट्विटर यूजर्ससाठी हा नियम लागू होणार आहे, ज्या अंतर्गत ट्विटर यूजर्संना पैसे घेऊन ब्लू टिक दिली जाईल. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी कंपनी यूजर्सला दर महिन्याला 7 डॉलर (भारतात 570 रुपये) आकारेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com