Uganda Ebola
Uganda Ebola Dainik Gomantak

Uganda मध्ये इबोलाचा कहर, दोन जिल्ह्यांत लागू केला लॉकडाऊन

इबोलामुळे जवळपास 19 लोकांचा मृत्यू झाला असून, 58 जणांना याची लागण झाली आहे.
Published on

युगांडा देशात इबोलाचा प्रादुर्भाव वाढला आहे. इबोलाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर युगांडाचे अध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी दोन जिल्ह्यांत लॉकडाऊन लागू केला आहे. रात्रीच्या वेळी कर्फ्यू आणि सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 20 सप्टेंबर रोजी इबोलाचा रूग्ण आढळला. त्यानंतर जवळपास 19 लोकांचा मृत्यू झाला असून, 58 जणांना याची लागण झाली आहे.

Uganda Ebola
Russia Deployed Nuclear Bomber: रशियाने तैनात केले 11 न्युक्लियर बॉम्बर; उपग्रह छायाचित्रातून आले समोर

देशातील मुबेंदे आणि कासांडा या मध्यवर्ती जिल्ह्यांना इबोलाचा सर्वाधिक फटका बसला आहे. चांगली बाब म्हणजे 15 लाख लोकसंख्या असलेल्या कंपालाच्या राजधानीत हा संसर्ग पोहोचलेला नाही. युगांडाचे अध्यक्ष मुसेवेनी यांनी मुबेंडे आणि कासांडा येथे तात्काळ लॉकडाउन करण्याचे आदेश दिले आहेत. संध्याकाळपासून सकाळपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यानुसार या जिल्ह्यांत प्रवासावर निर्बंध आणि बाजार, बार आणि चर्च 21 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Uganda Ebola
Xi Jinping: जिनपिंग तिसऱ्यांदा बनणार चीनचे राष्ट्राध्यक्ष

गुरिल्ला नेता-अध्यक्ष मुसेवेनी 1986 पासून युगांडावर राज्य करत आहेत. मुसेवेनी म्हणाले, मुबेंदे आणि कसंदा जिल्ह्यात सध्या लोकांच्या हालचालींवर बंदी घातली आहे. तसेच, मालवाहू गाड्ंयाना या दोन ठिकाणी प्रवेश करण्यास परवानगी दिली जाईल, पण इतर सर्व प्रकारची वाहतूक - बंद करण्यात आली आहे. असे मुसेवेनी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com