Dutch Sperm Donor Jonathan M
Dutch Sperm Donor Jonathan MDainik Gomantak

550 मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीला कोर्टानेच घातली बंदी; पुन्हा बाप झाल्यास देणार 'हा' दंड

जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण
Published on

Dutch Sperm Donor Jonathan M.: नेदरलँडमधील एका न्यायालयाने एका पुरुषावर पुन्हा बाप होण्यास चक्क बंदी घातली आहे. अर्थात या बंदीचे कारणही तसेच आहे. हा व्यक्ती एक दोन नव्हे तर तब्बल 550 अपत्यांचा बाप आहे. त्यामुळेच न्यायालयाला त्याच्यावर बंदी घालावी लागली असून यापुढे जर तो बाप बनला तर त्याला मोठा दंडही ठोठावला जाणार आहे.

या व्यक्तीचे नाव आहे जोनाथन एम. जोनाथन 550 अपत्यांचा बाप आहे, पण या अपत्यांच्या जन्माला तो थेट जबाबदार नाही. जोनाथन हा स्पर्म डोनर आहे. तो स्वतःचे शुक्राणू दान करतो. त्यातून ही अपत्ये जन्माला आली आहेत.

म्हणजे जोनाथन या मुलांचा केवळ जैविक पिता आहे. आणि जगभरातील विविध देशांमध्ये ही 550 अपत्ये आहेत.

Dutch Sperm Donor Jonathan M
Goa Drugs Cartel: रशियाच्या ऑलिम्पिक पदक विजेतीने गोव्यात असं तयार केलं होतं जाळं

तथापि, नेदरलँडमधील हेग जिल्हा न्यायालयाने आता जोनाथनला शुक्राणू दान करण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाने शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले. जोनाथनवर त्याच्या शुक्राणुंसाठी इच्छूक असलेल्या कुटूंबियांना त्याच्या जैविक मुलांच्या संख्येबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप आहे.

ईव्हा या महिलेने तसेच इतर काही पालकांसह गर्भवती महिलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या डोनरकाईंड या फाऊंडेशनने ही याचिका दाखल केली होती. ईव्हाने 2018 मध्ये जोनाथनच्या शुक्राणूंच्या सहाय्याने गर्भधारणा केली होती. तिने मुलाला जन्मही दिला.

ईव्हाने म्हटले आहे की, 'मला आशा आहे की या निर्णयामुळे मास (स्पर्म) डोनेशनवर बंदी येईल. जोनाथनने तिला तो केवळ २५ जैविक मुलांचाच बाप असल्याचे सांगितले होते. त्याने नियम मोडला आहे. माझ्या मुलावर काय परिणाम होईल का, याची आता भीती वाटते. जोनाथनला 500 पेक्षा जास्त मुले आहेत हे माहिती असते तर मी त्याला कधीच निवडले नसते.

Dutch Sperm Donor Jonathan M
BBC Chairman Resigns: BBC च्या चेअरमनने दिला राजीनामा, 'या' गोंधळानंतर घेतला मोठा निर्णय!

फाउंडेशनचे वकील मार्क डी हेक म्हणाले की, जोनाथनने 25 पेक्षा जास्त मुलांचा पिता होण्यचा नियम मोडला. न्यायालयाने डच मार्गदर्शक तत्त्वांची दखल घेतली. त्यानुसार शुक्राणू दात्यांनी 12 पेक्षा जास्त महिलांना शुक्राणू दान करू नये किंवा 25 पेक्षा जास्त मुलांचे वडील होऊ नये. जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये कोणतीही मानसिक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी हे आवश्यक आहे.

न्यायालयाने लेखी निर्णयात म्हटले आहे की, जोनाथन एम. या दात्याने अनेकांना शुक्राणू दान केले. यात डच प्रजनन क्लिनिक आणि डॅनिश क्लिनिकचा समावेश आहे. याशिवया जाहिरातींवरून तसेच ऑनलाइन माध्यमातून संपर्क करूनही त्याने शुक्राणूंचा पुरवठा केला होता. 41 वर्षीय जोनाथनने किमान 13 क्लिनिकमध्ये शुक्राणू दान केले, त्यापैकी 11 नेदरलँडमध्ये आहेत.

त्याने इतर संस्थांना स्पर्म दान केले आहे का, हे आता त्याला न्यायालयात सांगावे लागणार आहे. नाव लपवलेल्या प्रत्येक शुक्राणू क्लिनिकसाठी त्याला 25,000 युरोचा दंड भरावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com