
Drunken passenger assaults female crew member, bites cabin attendant on All Nippon Airways (ANA) flight:
फ्लाइटमधील गोंधळाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यावेळी ही घटना जपानहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात घडली.
ऑल निप्पॉन एअरवेज (ANA) विमानात एका प्रवाशाने महिला क्रू सदस्यावर हल्ला केला. मंगळवारी संध्याकाळी एएनए विमानाने उड्डाण केल्यानंतर मद्यधुंद प्रवाशाने केबिन अटेंडंटला चावा घेतला, असे एअरवेजने सांगितले.
प्रवाशाने महिला क्रू मेंबरला चावा घेतल्याचे पाहून वैमानिकाने विमान पुन्हा टोकियोच्या दिशेने वळवले. वैमानिकाला विमान पॅसिफिक ओलांडून हानेडा विमानतळाकडे परत वळवावे लागले. त्याला टोकियोमध्ये परत आणण्यात आले. आरोपीला विमानतळावर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान या विमानात 159 प्रवासी होते.
प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्णपणे नशेच्या नशेत असलेल्या ५५ वर्षीय अमेरिकन प्रवाशाने विमानात हा गोंधळ घातला. त्याने आधी दंगा केला आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने क्रू मेंबरच्या हाताला चावा घेतला.
यामुळे क्रू मेंबरला किरकोळ दुखापत झाली आहे. प्रवाशाने पोलिसांसमोर सांगितले की, मला मी काय केले याबद्दल काहीच आठवत नाही. आपल्यावरील आरोपांची आपल्याला काहीच माहिती नाही आणि मी हे केव्हा केले? असे तो म्हणाले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान टोकियोमध्ये उतरल्यानंतर आरोपी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. ज्या महिला क्रू मेंबरचा हात चावल्यामुळे जखमी झाला होता तिला उपचारासाठी पाठवण्यात आले. प्रवासी अमेरिकन असल्याची माहिती समोर आली आहे.
टोकियो मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाने सांगितले की, ते या प्रकरणाची अधिक माहिती देऊ शकत नाहीत. या घटनेने विमानातील प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी देखील अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. याआधी अलीकडेच कोरियाला जाणार्या एका जपानी विमानाच्या इंजिनमधून पक्षी आदळल्याने धूर निघत होता, तरीही विमान सुखरूप उतरले.
दुसरीकडे भारतातही विमान प्रवासांमध्ये वाद आणि व्हायला नकोत अशा घटना घडत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.