Bicholim Road: खड्ड्यांपेक्षा रंबलर्समुळे डिचोलीतील वाहनचालक ग्रस्त!

Goa Road: लहान आकाराचे गतिरोधक घालावेत अशी मागणी
Goa Road: लहान आकाराचे गतिरोधक घालावेत अशी मागणी
Bicholim Road Rumblers Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत डिचोलीतील बहुतेक रस्ते यंदा अजूनतरी सुरळीत असले, तरी वाहनचालकांना रस्त्यांवरील भलत्याच समस्येने ग्रासले आहे. ही समस्या म्हणजे काही ठिकाणी रस्त्यांवर घातलेले ‘रंबलर्स’.

रस्त्यांवरील खड्ड्यांपेक्षा हे रंबलर्स वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. रंबलर्सना वाहनचालकांचा विरोध असून त्याऐवजी लहान आकाराचे गतिरोधक घालावेत, अशी मागणी होत आहे.

अपघातांचा धोका टळावा म्हणून डिचोली शहरासह मुख्य रस्त्यावर साखळी, सर्वण आदी काही ठिकाणी ‘रंबलर्स’ घालण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी रंबलर्स व्यवस्थित घातलेले नाहीत. या रंबलर्समुळे वाहनांच्या सुट्या भागांची मोडतोड तर होतेच, याशिवाय वाहनचालकांसह इतर प्रवाशांच्या कंबरेला मार बसत आहे.

अशा वाढत्या तक्रारी आहेत. तसेच अतिवेगाने या रंबलर्सवरून वाहन गेल्यास अपघातही घडत आहेत. तीन महिन्यांपूर्वी साखळी येथे रंबलर्समुळे एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला होता. रंबलर्सवरून दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत.

Goa Road: लहान आकाराचे गतिरोधक घालावेत अशी मागणी
Bicholim News: व्हाळशी तळ्यातील मगरीने पाडला श्वानाचा फडशा

अवजड वाहनांचा मोठा आवाज

दोन महिन्यांपूर्वी डिचोली-साखळी रस्त्यावरील सर्वण जंक्शनजवळ ‘रंबलर्स’ बसविले आहेत. सर्वण जंक्शन ते गोकुळवाडापर्यंत सहा ठिकाणी त्याशिवाय मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या सर्वणच्या अंतर्गत रस्त्यांवरही रंबलर्स घातले आहेत. हे रंबलर्स घालताना व्यवस्थित नियोजन करण्यात आलेले नाही. रंबलर्सचा आकारही मोठा आहे. अवजड वाहने या रंबलर्सवरून वेगाने गेली, तर मोठा आवाज होत असतो. रात्रीच्यावेळी तर हे रंबलर्स डोकेदुखी ठरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com