डॉ. फौचींचे ईमेल्स लीक; काय आहे चीन कनेक्शन जाणून घ्या

doctor fauchi.jpg
doctor fauchi.jpg

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना आता एक धक्कादायक खुलासा काही ईमेलच्या माध्यमातून समोर आला आहे. व्हाइट हाऊसचे वैद्यकीय सल्लागार डॉ.अँथनी फौची (Anthony Fouci ) यांचे काही ईमेल्स अमेरिकन प्रसारमाध्यमांना (American media) सापडले असून त्यामधून बरीच मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉ. फौची हे चीनी वैज्ञानिकांच्या संपर्कात होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या कार्यकाळापासून ते आतापर्यंत डॉ. फौची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रमुख वैज्ञकिय सल्लागार आहेत. असं असताना डॉ. फौची चीनी वैज्ञानिकांच्या संपर्कात असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे  अमेरिकेच्या राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. (Dr Foucis emails leaked Learn what is China connection)

या विधानाबद्दल मागितली माफी
अमेरिकेतील प्रसिध्द वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने 866 पानांचा मजकूर असणारा डॉ. फौचींचे इमेल संवाद जगासमोर आणला आहे. हा इमेल 28 मार्च 2020 रोजी डॉ. फौची यांनी चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रव्हेंशनचे निर्देशक जॉर्ज गाओ (George Gao) यांनी पाठवला होता. या इमेल मध्ये अमेरिकेतील लोकांना मास्क घालण्यावरुन केलेल्या वक्तव्याबद्दल गाओ यांनी माफी मागितली होती. अमेरिकेत नागरिकांना कोरोना काळात मास्क घालण्यासंदर्भात दिलेली सूट ही मोठी चूक असल्याची टीका गाओ यांनी केली होती.

डॉ. अँथनी फौचींनी दिला रिप्लाय
जॉर्ज गाओ यांनी आपल्याच वक्तव्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले, मी इतरांच्या निर्णयांना मोठी चूक कशी म्हणू शकतो? हा शब्द मी वापरलेला नसून माध्यमांनी वापरला आहे. मला खात्री आहे की, मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला नक्की समजलं असेल. आपण एकत्र येऊन या कोरोना महामारीला रोखलं पाहिजे. डॉ. फौची यांनी या इमेलला उत्तर देताना म्हटले, 'मला पूर्ण कल्पना आहे की, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते. आपण हे एवढ मोठं लक्ष एकत्र काम करुन साध्य करुयात.'

बिल गेट्स यांच्याही नावाची चर्चा 
हा इमेल मार्च आणि एप्रिल 2020 मध्ये गाओ आणि डॉ. फौची यांच्या दरम्यान झालेल्या 866 पानांच्या संवादापैकी एक भाग असल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टने(theWashingtonPost)केला आहे. माहिती अधिकारच्या कायद्यांतर्गत वॉशिंग्टन पोस्टने ही माहिती सरकारकडून प्राप्त केली आहे. डॉ. फौची यांनी आपण बिल गेट्स (Bill Gates)आणि मेलिंडा फाऊंडेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आलेल्या इमेलमधून देण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये बिल गेट्स यांच्या नावाचाही उल्लेख केला गेला आहे. ऑक्सफर्डच्या कोरोना लसीसंदर्भात मायक्रोसॉप्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत.

मी तुम्हाला टेलिव्हीजनवर रोज पाहतो..

डॉ. फौची यांच्याबरोबर प्रदिर्घ अशी चर्चा झाल्यानंतर या संबंधित अधिकाऱ्याने बिल गेट्स यांचे सल्लगार एमिलिओ एमिनी यांच्याबरोबर चर्चा केली. या अधिकाऱ्याने चर्चेदरम्यान एमिनी यांच्याकडे डॉ. फौची यांच्या आरोग्यासंदर्भात आपली चिंता व्यक्त केली होती. 2 एप्रिल 2020 रोजी डॉ. फौची यांना एक इमेल केला होता. मी तुम्हाला टेलिव्हीजनवर रोज पाहतो. तुम्ही खूप भरभरुन बोलत असता. मला मात्र तुमच्या आरोग्यासंदर्भात चिंता वाटत राहते. जगाला आणि देशाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे, असे या इमेलमध्ये एमिनी यांनी म्हटले आहे. या इमेलला उत्तर देताना डॉ. फौची म्हणतात, 'मी सध्याच्या कठीण परिस्थितीला वर्तमानाशी शक्य तेवढे जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहे.'

डॉ. फौचींचा डोनाल्ड ट्र्म्प यांच्या सोबत 36 चा आकडा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत डॉ. फौची यांचे संबंध फारसे चांगले नव्हते. अनेक वेळा ट्रम्प यांनी फौचींच्या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी आपल्या शेवटच्या कार्यकाळात काही दिवसांमध्ये सार्वजिनक मंचावरुन डॉ. फौची यांना सल्लागार पदावरुन हटवण्यासंदर्भात वक्तव्ये केली होती. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान डॉ. फौची यांना हटवण्याच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. मात्र ट्रम्प यांनी राजकीय नुकसान टाळण्यासाठी डॉ. फौचींना पदावरुन हटवलं नाही. मागील बऱ्याच काळापासून डॉ. फौची हे भारतात चर्चेत आहेत. कोरोना व्यवस्थापन आणि सल्ल्यांमुळे डॉ. फौची यांचं नाव भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत होते.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com