"शाहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर महान लोक...''; दहशतवाद पसरवणाऱ्यांना ट्रम्प यांच्याकडून 'ग्रेट पीपल'चा दर्जा, आसियान परिषदेत उधळली स्तुतीसुमने

Donald Trump Statement: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची अति-स्तुती करणारे ट्रम्प यांनी यावेळी तर त्यांच्या स्तुतीमध्ये कोणतीही कसर सोडली नाही.
Donald Trump, PM Shahbaz Sharif and Army Chief Asim Munir
Donald Trump, PM Shahbaz Sharif and Army Chief Asim Munir
Published on
Updated on

Donald Trump Statement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानकडून भू-खनिजे आणि इतर लाभ मिळवण्याच्या प्रयत्नात आपली पातळी बऱ्याच अंशी खाली आणल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची अति-स्तुती करणारे ट्रम्प यांनी यावेळी तर त्यांच्या स्तुतीमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. ट्रम्प यांनी शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना 'महान लोक' (Great people) असे संबोधले.

पाकिस्तान-अफगाणिस्तान वाद सोडवण्याचे आश्वासन

मलेशियातील कुआलालंपूर येथे आसियान (ASEAN) शिखर परिषदेदरम्यान थायलंड-कंबोडिया शांतता करारावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी पाकिस्तानी नेत्यांना "महान लोक" म्हटले. एवढचं नाहीतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाद "लवकरच" सोडवण्याचे वचन देखील दिले. ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या सरकारने आठ महिन्यांच्या कालावधील आठ युद्धे संपवली. ते पुढे म्हणाले की, "आम्ही दर महिन्याला सरासरी एक युद्ध संपवत आहोत. आता फक्त एकच शिल्लक आहे. मी ऐकले आहे की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे, पण मी त्यांच्यातील हा संघर्ष लवकरच संपवेन. मी दोघांनाही ओळखतो."

Donald Trump, PM Shahbaz Sharif and Army Chief Asim Munir
Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. ट्रम्प म्हणाले की, "पाकिस्तानचे फील्ड मार्शल आणि पंतप्रधान 'महान लोक' आहेत आणि यात मला शंका नाही.''

Donald Trump, PM Shahbaz Sharif and Army Chief Asim Munir
Donald Trump: ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का? टॅरिफ रद्द झाल्यास अब्जावधी डॉलर्सचा परतावा देण्यासाठी ट्रेजरी विभाग सज्ज

जीव वाचवण्यासाठी युद्ध संपवतो

ट्रम्प म्हणाले की, जर मी वेळ काढून लाखो लोकांचे जीव वाचवू शकत असेन, तर हे खरोखरच एक महान कार्य आहे. त्यांनी दावा केला की, आठ महिन्यांत आठ युद्धे संपवणे असे यापूर्वी कधीही झाले नाही. ट्रम्प पुढे म्हणाले की, "मला असा कोणताही राष्ट्राध्यक्ष दिसत नाही, ज्याने कधी एक युद्ध थांबवले असेल. ते युद्धाची सुरुवात करतात, मात्र संपवत नाहीत."

शेवटी ट्रम्प यांनी थायलंड-कंबोडिया संघर्ष सोडवण्याबद्दल तसेच अमेरिकेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com