Pakistan: आतंकवादाला हत्यार बनवणाऱ्या देशासोबत चर्चा...

Pakistan: यापुर्वी पाकिस्तानने भारताकडे काश्मीर( Kashmir )च्या मुद्द्यावर बोलण्यासाठी सहनशीलता नसल्याचे वक्तव्य केले होते.
S. Jaishankar
S. JaishankarDainik Gomantak

Pakistan: भारताचे परराष्ट्रमंत्री सध्या सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सायप्रमध्ये संबोधित करताना एस जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

यापुर्वी पाकिस्तानने भारताकडे काश्मीर( Kashmir )च्या मुद्द्यावर बोलण्यासाठी सहनशीलता नसल्याचे वक्तव्य केले होते. यावर एस. जयशंकर यांनी आंतकवादाला हत्यार बनवून भारताला चर्चेसाठी बोलावले जाऊ शकत नाही अशा शब्दात सुनावले आहे.

त्याचबरोबर, चीन( China) च्या संबंधाबाबत एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, सीमावादामुळे भारत-चीन संबंध चांगले नाहीत. कारण भारत( India) एलएसी रेषेला चीनकडे जाऊ देण्यास सहमती दर्शवणार नाही. दरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या तवांग प्रदेशात आमच्यापुढे बरीचशी आव्हान आहेत आणि ती कोव्हीडच्या काळात वाढली आहेत असेही एस जयशंकर यांनी म्हटले आहे.

S. Jaishankar
Pope Benedict Death: माजी पोप बेनेडिक्ट यांचे निधन; गत 600 वर्षात राजीनामा देणारे एकमेव पोप

मूळ मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही कारण आतंकवादाने कोणत्याही देशाचे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे भारताचे झाले आहे. त्यामुळे आंतकवाद्याच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. भारताकडे जेव्हापासून संयुक्त राष्ट्रपरिषदेत सुरक्षा परिषदेसाठी भारताची निवड झाली आहे तेव्हापासून भारताला पाकिस्तान अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असेही एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com