World Map: असा तयार झाला होता जगाचा पहिला नकाशा

World Map: जगाचा पहिला नकाशा कसा तयार झाला याबाबतचे कुतुहल कायम आहे. समुद्री खलाशांनी नवनवीन प्रदेशाचा ,देशांचा शोध घेतला आणि जगाला नवनवीन देशांची ओळख झाली.
World Map
World MapDainik Gomantak

World Map: आज आपण एखाद्या ठिकाणासाठी जाण्यासाठी किंवा एखादे ठिकाण शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करतो. जगातील कोणत्याही ठिकाणाची माहीती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मिळणे सहजशक्य झाले आहे.

मात्र जगाचा पहिला नकाशा कसा तयार झाला याबाबतचे कुतुहल कायम आहे. समुद्री खलाशांनी नवनवीन प्रदेशाचा ,देशांचा शोध घेतला आणि जगाला नवनवीन देशांची ओळख झाली. याबाबत असे म्हटले जाते की, ज्यांना खाण्या-पिण्याचा छंद होता अशा लोकांनी नवनवीन प्रदेशाचा शोध लावला. या खलाशांना विश्वास होता की दुनियाचा प्रत्येक हिश्यात कोणतीतरी नवीन चव त्यांची वाट बघत आहे आणि या चवीच्या शोधासाठी नवनवीन प्रदेशाचा शोध सुरु झाला असे म्हटले जाते.

दालचिनी आणि इलायची मिळवण्यासाठी लोकांनी खूप प्रवास केला. जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी अरब व्यापारी इलायचीच्या चिमणीची गोष्ट लोकांना सांगायचे. सिनेमोलॉगज नावाच्या या काल्पनिक पक्ष्यासाठी ते म्हणत असे की या चिमनीने झाडाला चोच मारल्यावर वेलची येते. मात्र ही एक काल्पनिक गोष्ट होती. समुद्री खलाशी व्यापारासाठी निघाले की नकाशा तयार करत पुढे जायचे आणि ज्या ठिकाणी जहाज थांबवतील त्या ठिकाणी परत जाण्याचा नकाशा बनवायचे.

पंधराव्या शतकापासून सलग तीनशे वर्षापर्यत नकाशा बनवण्याचे सुरु होते.याच काळाला एज ऑफ एक्सप्लोरेशन असेही म्हणतात. याचदरम्यान, व्यापार ,पैसा आणि नवीन जाणून घ्यायची इच्छा या सगळ्या गोष्टींनी जगाचा कोपरा न् कोपरा एकमेकांसोबत जोडला गेला.

World Map
Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तान शाही शौक! 1.2 अब्ज किमतीच्या आलिशान कार केल्या खरेदी

याबरोबरच, नकाशा बनवण्याचे आणखी एक कारण सांगितले जाते. त्याकाळात समुद्र देश आणि महाद्वीपांना जोडत असे. एक देश दुसऱ्या देशावर समुद्रामार्गे प्रभुत्व मिळवत असे. त्यामुळे शेजारी देशांना दुसरीकडे जाण्यासाठी किंवा दुसऱ्या प्रदेशात जाण्यासाठी रस्ता मिळत नसे.तेव्हा इतर प्रदेशांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी नकाशा बनवण्याचे काम सुरु झाले. पहिला नकाशा कोणी बनवला याबाबत मात्र वादविवाद आहेत. 6100 BC अनातोलिया ( तुर्की) मध्ये काही गुहा चित्रे आहेत जी नकाशे असल्याचा दावा केला जातो.

तसे, पहिला नकाशा 15 व्या शतकाच्या मध्यात इटलीमध्ये बनविला गेला. चामड्यावर बनवलेल्या नकाशाला प्लानास्फेरो असे म्हणतात.हा नकाशा आजही इटलीतील व्हेनिस शहरातील एका संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. नकाशा इतका विस्तीर्ण आहे की जर तो पसरला तर तो अनेक किलोमीटर पसरू शकतो. पोर्तुगाल( Portugal ) आणि इटली( Italy )ने जग शोधण्यात आणि नकाशे बनवण्यात खूप काम महत्वाचे काम केल्याचे म्हटले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com