Boat Accident: मध्य काँगोमध्ये भीषण अपघात, बोट बुडाल्याने 80 जणांचा मृत्यू; राष्ट्रपतींनी दिले तपासाचे आदेश

Democratic Republic Of Congo: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Boat Accident
Boat AccidentDainik Gomantak

Democratic Republic Of Congo: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँगोच्या माई-एनडोम्बे प्रांतातील क्वा नदीतून प्रवास करत असलेल्या 80 हून अधिक लोकांचा मृत्यू बोट उलटून मृत्यू झाला. बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेनंतर देशाच्या राष्ट्रपतींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपती फेलिक्स त्सेसीकेदी यांनी बुधवारी सांगितले की, माई-एनडोम्बे प्रांतातील क्वा नदीतील बोट अपघातात 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्यात येईल. या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, कांगोच्या जलक्षेत्रात बोट अपघाताच्या घटना वारंवार घडतात, जिथे जहाजे बऱ्याचदा क्षमतेपेक्षा जास्त लोड केली जातात. मध्य आफ्रिकन देशाच्या विस्तीर्ण आणि जंगली भागात फारच कमी पक्के रस्ते आहेत. त्यामुळे इथे लोक नदीने प्रवास करतात.

Boat Accident
Congo Violence: काँगोमध्ये हिंसाचार सुरुच! विस्थापितांच्या छावणीवर बॉम्ब हल्ला; 35 जणांचा मृत्यू

राष्ट्रपती फेलिक्स त्सेसीकेदी यांनी चौकशीचे आदेश दिले

राष्ट्रपती फेलिक्स त्सेसीकेदी यांनी सांगितले की, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या माई-एनडोम्बे प्रांतातील मुशी शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर क्वा नदीतील बोट अपघातात 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, राष्ट्रपतींनी ही दुर्दैवी घटना कशामुळे घडली याच्या कारणांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरुन भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये.

Boat Accident
Congo Heavy Rain And Landslide: काँगोमध्ये मुसळधार पावसाने केला कहर; भूस्खलनामुळे 15 जणांचा मृत्यू, 60 लोक बेपत्ता

दुसरीकडे, या आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी आवश्यक मदत पोहोचवण्याचे निर्देश राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना दिले. ही दुर्दैवी घटना कशामुळे घडली याच्या कारणांचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले. माई-एनडोम्बे प्रांताच्या गव्हर्नर रिटा बोला दुला यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, रात्री नौकानयनामुळे ही घटना घडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com