Afghanistan: पुरुषांशिवाय राहणाऱ्या महिलांसाठी तालिबानचा तुघलकी फर्मान; घातली 'ही' बंदी

Taliban: विशेषतः महिलांसाठी तुघलकी फर्मान जारी करत आहेत. या संदर्भात तालिबानने एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी फर्मान जारी केला आहे.
Afgan Women
Afgan WomenDainik Gomantak

Afghanistan News: जेव्हापासून तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता आपल्या हातात घेतली, तेव्हापासून ते तेथील लोकांसाठी, विशेषतः महिलांसाठी तुघलकी फर्मान जारी करत आहेत. या संदर्भात तालिबानने एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी फर्मान जारी केला आहे. तालिबानने म्हटले आहे की, एकट्या राहणाऱ्या महिला, म्हणजे अविवाहित महिला ज्या आपल्या पती किंवा भावासोबत राहत नाहीत, त्यांच्यावर ट्रॅव्हल करणे आणि मेडिकल सेंटरमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, जर एखाद्या महिलेला पुरुष पालक नसेल, तर तालिबान सरकारने अशा महिलांना प्रवास करण्यास आणि मेडिकल सेंटरमध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. अफगाणिस्तानच्या मिनिस्ट्री ऑफ कंडक्टच्या अधिकार्‍यांनी एखाद्या महिलेला मेडिकल सेंटरमध्ये नोकरी सुरु ठेवायची असल्यास लग्न करण्याची अट घातली. कारण लग्न न झालेल्या स्त्रीने नोकरी करणे योग्य नाही.

Afgan Women
Afghanistan: तालिबानने भारताकडे मागितली मदत, पाकिस्तानने दिली धमकी; वाचा नेमकं प्रकरण

दुसरीकडे, 2021 मध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानातील महिलांची वाईट परिस्थिती सुरु झाली आहे. तालिबानने सरकार स्थापन केले तेव्हा ते 20 वर्ष जुन्या तालिबानसारखे नसून त्यांचे उदारवादी तालिबान सरकार असेल असे वचन दिले होते. परंतु आता उदारवादी दिशेने कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. तालिबान लोकांच्या, विशेषत: महिलांच्या स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर आपले तुघलकी फर्मान जारी करतच आहे. तालिबानने यापूर्वीच शिक्षण बंद करणे, कधी रेडिओ केंद्रे चालवणे, कधी ब्युटी पार्लर बंद करणे असे आदेश दिले आहेत.

Afgan Women
Afghanistan Earthquake: भूकंपाने हादरले अफगाणिस्तान, अनेक इमारती जमीनदोस्त; 1000 हून अधिक जणांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रानेही तालिबानचा निषेध केला आहे

दरम्यान, सहावीनंतर महिलांना शिक्षण घेण्यावर बंधने, ब्युटी पार्लर बंद करणे आणि महिलांचे कपडे घालण्यासंबंधीचे अनेक नियम यामुळे अफगाणिस्तानातील महिलांची अवस्था दयनीय होत आहे. या प्रकरणी खुद्द यूएनने अनेकवेळा तालिबानच्या आदेशाचा निषेध केला आहे. हिजाब न घालणाऱ्या महिलांना तालिबान सरकार अटक करते. 2022 च्या आदेशानुसार हिजाब घातलेल्या महिलांचे फक्त डोळे दिसले पाहिजेत. 1996 ते 2001 या काळात पूर्वीच्या तालिबान राजवटीतही असाच आदेश लागू होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com