Turkey Syria Earthquake: तुर्कीयेत 4 दिवसानंतरही ढिगाऱ्यातून मृतदेह काढणे सुरूच; मृतांची संख्या 21 हजारांवर...

थंडीमुळे बचावकार्यात अडथळे, जगभरातून मदतीचा ओघ
Turkey Syria Earthquake
Turkey Syria EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Earthquake in Turkey Syria: तुर्कीयेमध्ये 6 फेब्रुवारीला सकाळी भूकंप झाला, म्हणजेच आजपर्यंत 4 दिवस झाले आहेत. भूकंपानंतर तुर्कीये आणि सीरियामध्ये मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढणे सुरू आहे.

आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. अत्यंत थंडीमुळे बचावकार्यातही अडचणी येत आहेत.भूकंपाच्या या धक्क्यांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो लोक रुग्णालयात दाखल आहेत.

Turkey Syria Earthquake
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर...

अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळ जाईल तसा ढिगाऱ्याखाली जीवंत माणसे मिळून येण्याची आशाही कमी होत आहे. भुकंपाला चार दिवस उलटले आहेत.

ढिगाऱ्याखाली काही लोक जिवंत असले तरी या चार दिवसांत भूक, तहान आणि थंडीमुळे त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.

जगभरातून मदतीचा ओघ

दरम्यान, जागतिक बँकेने तुर्कीयेला 1.78 अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा केली आहे. भूकंपग्रस्त तुर्कस्तान आणि सीरियाला मदत करण्यासाठी अमेरिकेने 85 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.

भारताने केली मदत

70 देशांसोबत भारतानेही भूकंपाचा तडाखा बसलेल्या तुर्कीयेला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत तुर्कस्तानला विशेष मदत पाठवली आहे. भारतातून NDRF च्या 3 टीम बचाव कार्यासाठी तुर्कीएला पोहोचल्या आहेत.

यामध्ये विशेष बचाव श्वान पथकाचाही समावेश आहे. याशिवाय भारतीय लष्कराचे वैद्यकीय पथकही तुर्कीयेला पोहोचले आहे. भारतीय लष्कराने हाताय शहरात फील्ड हॉस्पिटल बांधले आहे. जिथे जखमींवर उपचार सुरू आहेत. एवढेच नाही तर एनडीआरएफचे पथकही बचावकार्य करत आहेत.

Turkey Syria Earthquake
Mahadayi Water Dispute : मुख्यमंत्र्यांना पक्षनिष्ठाच महत्त्वाची!

तुर्कीयेमध्ये 6 फेब्रुवारीला पहाटे 4.17 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 तीव्रता होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीयेच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. लोक त्यातून सावरण्याआधी, थोड्या वेळाने दुसरा भूकंप झाला, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 होती.

यानंतर 6.5 रिश्टर स्केलचा आणखी एक धक्का बसला. या भूकंपांनी मालत्या, सानलिउर्फा, उस्मानीये आणि दियारबाकीरसह 11 प्रांतांमध्ये हाहाकार माजवला. सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी भूकंपाचा आणखी एक धक्का बसला. या धक्क्याने सर्वाधिक विध्वंस झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com