काल भारतीय लष्कराने पकडलेल्या सैनिकाला सोडण्याची 'चीन'ची मागणी

A day after a Chinese soldier was apprehend by the Indian Army at the southern bank of Pangong Tso in eastern Ladakh China demanded his immediate release
A day after a Chinese soldier was apprehend by the Indian Army at the southern bank of Pangong Tso in eastern Ladakh China demanded his immediate release
Published on
Updated on

लडाख :  काल भारतीय लष्करानी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरच्या गुरुंग हिल भागात पकडलेल्या चिनी सैनिकाला तात्काळ सोडण्याची मागणी चीनकडून करण्यात आली आहे. काल रात्री सीमेजवळ अंधार असल्यानं तो सैनिक रस्ता चुकला, असं चीनकडून सांगण्यात आलं आहे.

काल भारतीय लष्करानी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरच्या गुरुंग हिल भागात चिनी सैनिकाला पकडलं होतं. चुकून तो भारतीय हद्दीत अल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळाली होती. काही महिन्यांभरापूर्वी असाच एक चिनी सैनिक भारतीय हद्दीत आल्यानंतर भारतीय सैन्याने त्यास पकडले होते.परंतु काही दिवसात प्रक्रिया पूर्ण करुन त्याला चीनकडे सोडण्यात आले होते.

मागील काही दिवसांपासून पूर्व लडाख भागात भारत-चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.मात्र लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र आपेक्षित यश मिळताना दिसले नाही.अजूनही सीमावादाचा तिढा सुटलेला नाही.भारतीय लष्करांनी चिनी सैनिकाला जशास तसे उत्तर दिले आहे.जून महिन्यात गलवान परिसरात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष माजला होता.याच भागातील महत्वाच्या टेकड्यां भारतीय सैनिकांनी आपल्या ताब्यात घेवून चीनवर रणनितीकदृष्ट्या विजय मिळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com