वॉशिंग्टन: कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नवीन प्रकार, ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) जगभरात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे बहुतांश देशांनी विमानतळावर कोरोना नियम, आयसोलेशन आणि कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. दरम्यान, अमेरिकेतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आल्यानंतर फ्लाइटच्या बाथरूममध्ये आयसोलेट (covid isolation) करावे लागले. 'द ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, शिकागोहून आइसलँडच्या विमान प्रवासादरम्यान कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अमेरिकन महिलेला फ्लाइटच्या बाथरूममध्ये पाच तास वेगळे ठेवण्यात आले होते.
WABC-TV ने वृत्त दिलेल्या वृत्तानुसार मिशिगनमधील शिक्षिका मारिसा फोटियो यांनी सांगितले की, 19 डिसेंबर रोजी प्रवासादरम्यान तिचा घसा दुखू लागला. त्यामुळे ती कोविड चाचणी करण्यासाठी पटकन बाथरूममध्ये गेली. आणि तिथेच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. फोटियोने सीएनएन न्यूजला सांगितले की तीने विमानतळावर 2 पीसीआर चाचण्या आणि 5 रॅपिड चाचण्या केल्या आहेत. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, पण फ्लाइटमध्ये सुमारे दीड तासानंतर तीने घसा दुखत असल्याची तक्रार केली त्यामुळे पुन्हा तीची रॅपीड टेस्ट करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला.
"मला फ्लाइटमध्ये चढल्यानंतरच काही समस्या येत होत्या. मनात अनेक गोष्टींची भीती होती. मग मी स्वतःला धीर दिला आणि पुन्हा कोविड टेस्ट केली. आणि रिपोर्ट बघून मला धक्काच बसला. कारण मला कोरोनाची लागण झाली होती," फोटियो यांनी सांगितले. रिपोर्टनुसार, फोटियोने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. बूस्टर शॉटही घेतला आहे. ती दर आठवड्याला तिची कोविड चाचणी करून घेते, कारण ती निरक्षर लोकांसोबत काम करते. सध्या फोटियोच्या प्रवासानंतर ती काही दिवस घरीच आयसोलेशनमध्ये आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.