COVID-19: A new strain GAMA  of the corona virus in Russia
COVID-19: A new strain GAMA of the corona virus in Russia Dainik Gomantak

COVID-19: रशियात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार

रशियात सध्या डेल्टा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे, तर आता गामा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव आढळल्याने रशियाची चिंता आता अधिक वाढताना दिसत आहे.
Published on

ब्राझीलमध्ये(Brazil) सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या(COVID-19) नॉवेलचा गामा(Gamma) प्रकार, आता रशियामध्ये(Russia) आढळला असल्याची माहिती समोर येत आहे. इंटरफॅक्स न्यूज एजन्सीने दिलेल्या एका अवहलात सांगतले आहे.

मागील अनेक दिवसांपासून रशियात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे, याचे कारण कोरोना व्हायरसचा नवीन डेल्टा प्रकार आणि देशात कमी प्रमाणात होत असेलेलय लसीकरणाला दोष दिला जात आहे.नोंदणीकृत असलेल्या चार लसपैकी रशियामधील एपिवाॅककोरोना सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटने विकसित केलेली एक लास आहे तर स्पुतनिक व्ही ही रशियाची मुख्य लस आहे. गेल्या २४ तासांचा विचार करता रशियात एकूण 24,471 नवीन रुग्ण आढळले असून 796 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

रशियात सध्या डेल्टा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे, तर आता गामा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव आढळल्याने रशियाची चिंता आता अधिक वाढताना दिसत आहे.रशियाची चिंता वाढायचे एक कारण हे ही आहे की हा गामा व्हेरिएंट अधिक ताकतीने शरीरात पसरतात आणि शरीरातील अँटीबॉडीज नसत करतात. परंतु या नवीन व्हायरवर सुद्धा स्पुतनिक व्ही लस प्रभावी आहे, असा अभ्यासकांचा दवा असल्याचेदेखील इंटरफॅक्स न्यूज एजन्सीने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com