Omicron : फायझर लसीचा फारच कमी परिणाम, लॅब चाचणीत उघड

आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर अॅलेक्स सिगल यांनी ट्विटरवर माहिती देत सांगितले की, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या न्यूट्रलायझेशनमध्ये मोठी घट झाली आहे
Pfizer
Pfizer Dainik Gomantak
Published on
Updated on

Omicron vs Pfizer BioNTech : ओमिक्रॉन (Omicron) हा विषाणू आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा किती धोकादायक आहे यावर अजूनही चर्चा आणि संशोधन (Research) होत आहे. दरम्यान, ओमिक्रॉनवरील लसीवर अभ्यास करण्यात आला आहे, हा अभ्यास दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटने फायझर लसीवर केला आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ओमिक्रॉनवर फायझर (Pfizer) लसीच्या दोन डोसचा परिणाम केवळ काहीशा प्रमाणावर होताना दिसत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे.

या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्यांना आधीच कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक टेस्टमध्ये, व्हेरियंटचा काहीशा प्रमाणावर झाला होता. अभ्यासात असेही सुचवण्यात आले आहे की, लसीचा बूस्टर डोस यापासून संरक्षण करू शकतो. आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर अॅलेक्स सिगल यांनी ट्विटरवर माहिती देत सांगितले की, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या न्यूट्रलायझेशनमध्ये मोठी घट झाली आहे, जी पूर्वीच्या कोविड स्ट्रेनपेक्षा कमी आहे.

पुढे त्यांनी सांगितले आहे की, अशा 12 लोकांच्या रक्ताची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली, ज्यांनी फायझर/बायोटेक लस घेतली होती. यापैकी, 6 पैकी 5 लोक, ज्यांनी लसीचा डोस घेतला होता आणि त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांनी ओमिक्रॉन व्हेरियंटला असक्रिय ठरवले आहे. सिगल म्हणाले, मी जे विचार करत होतो त्या तुलनेत जे निकाल आले आहेत ते खूपच सकारात्मक आहेत. तुम्हाला जितके जास्त अँटीबॉडीज मिळतील, तितकी तुमची ओमिक्रॉनचा सामना करण्याची ताकद वाढेल.

Pfizer
Delta variant चा प्रतिकार करण्यात फायझर, एस्ट्राजेनेका कमी प्रभावशाली

सिगल यांनी असेही सांगितले की, ज्या लोकांची अद्याप प्रयोगशाळेत चाचणी झाली नाही, ज्यांना लसीचा बूस्टर शॉट मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेत असे लोक अजून अशी लस कुणाला दिली गेलेली नाही त्यामुळे ही परिस्थिती आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर जगातील अनेक देशांमध्ये रुग्ण समोर येऊ लागले आहेत. 26 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने याला 'Variant of Concern' म्हणून घोषित केले. मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, फायझर यासह अनेक लस निर्मात्यांप्रमाणे, यावर आतापर्यंत कोणताही प्रभावी डेटा समोर आलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com