फ्रान्समध्ये कोरोना विषाणूचा (Corona) संसर्ग वेगाने वाढत आहे. देशात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेत सहा वर्षाच्या मुलांसाठी फेस मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. फ्रान्समध्ये (France) कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होत असताना, अधिकाऱ्यानी शनिवारी जाहीर केले कि सहा आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना सार्वजनिक ठिकाणी मास्क (Mask)घालावे लागतील.
फ्रान्समध्ये सलग चोथ्या दिवशी कोरोनाच्या ओमिक्रॉनप्रकारातून संसर्गाची 200,000 हुन अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मास्क (Mask) घालण्यासाठी मुलांचे वय 11 वरून सहा वर्षापर्यंत कमी करून शाळा (School) बंद न करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. फ्रान्समध्ये सोमवारपासून शालेय वर्ग पुन्हा सुरु होतील आणि लहान मुलांना सार्वजनिक वाहतूक, क्रीडा संकुल आणि प्रार्थनास्थळांवर मास्क घालावे लागतील.
मास्क घालणे अनिवार्य करण्याचा हा आदेश पॅरिस आणि ल्योनसारख्या शहरांमध्ये वाढविण्यात आला आहे. येथे घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी फ्रान्समध्ये संसर्गाची 219,126 नवीन प्रकरणे आढळली, जी 2021 च्या शेवटच्या दिवशी 232,200 च्या दैनंदिन प्रकरणापेक्षा थोडी कमी आहे. फ्रान्स सरकार अर्थव्यवस्थेला हानिकारक लॉकडाऊन (Lock down) किंवा कर्फ्यू लावल्याशिवाय , वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन (Omicron) प्रकारामुळे महामारीची तिसरी लाट रोखण्याचा प्रयत्न करत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.