Turkey-Syria Earthquake: तुर्की- सिरीयामध्ये झालेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. 50 हजारांपर्यत हा आकडा गेल्याचे माहिती मिळाली आहे.
त्याचबरोबर, 1.6 लाख इमारती कोसळल्याचेदेखील समोर आले आहे. 6 फेब्रुवारीला आलेल्या या भूकंपात 5,20,000 अपार्टमेंटसहित 1.6 लाख इमारती जमीनदोस्त झाल्याचे समोर आले आहे. तुर्कीमध्ये आलेल्या या रिश्टर स्केलनुसार भूकंपाची तीव्रता 7.8 मॅगनीट्यूड इतकी होती. मालाटया, सनलीउर्फा, ओस्मानिए आणि दियारबाकिर सहित 11 प्रातांत भूकंपाने तांडव निर्माण केले होते.
या विनाशकारी भूकंपात हजारोंनी आपले प्राण गमावले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानीदेखील झाली आहे. भूकंपानंतर जगभरातून तुर्की आणि सिरिया( Syria)ला मदत करण्यासाठी कित्येक देश पुढे आले आहेत.
दरम्यान, भारताने( India )देखील तुर्कीला मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त याअंतर्गत तुर्कीला बचावकार्य करणारी टीम पाठवली होती. बचावकार्यासाठी वेगवेगळे गट भूंकपग्रस्त ठिकाणी पाठवले होते. हे बचावकार्य शेवटाकडे जात असताना भारताची टीम परतली आहेत.रविवारी बचावकार्यातली शेवटची टीम परतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.