Christmas Festival 2022: जगभरात आज ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. भारतातही दरवर्षी मोठ्या संख्येने लोक हा सण साजरा करतात. हा सण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गोव्यासह अनेक राज्यात या उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळतो. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गोव्यात (Goa) ख्रसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चर्च, बीच रोषनाइने सजवले जातात. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्टिट करत गोवेकरांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना, पीएम मोदींनी (PM Modi) समाजात आनंदाची भावना वाढविण्याविषयी सांगितले. त्याने ट्विट करून लिहिले, मेरी ख्रिसमस! हा विशेष दिवस आपल्या समाजात एकोपा आणि आनंदाची भावना वाढवू दे. प्रभू येशू ख्रिस्ताचे उदात्त विचार आणि त्यांनी समाजसेवेवर दिलेला भर आपल्याला आठवतो.
जो बायडन यांनी ख्रिसमस ट्री सजवतांना शेअर केला फोटो
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट केले की, जिल आणि मला आशा आहे की सुट्टीच्या काळात प्रत्येकजण कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवू शकेल. या काळात आपल्या प्रिय व्यक्तीला हरवलेल्या प्रत्येकासाठी आम्ही आमच्या हृदयात एक विशेष स्थान ठेवतो. आमच्या कुटुंबाकडून आम्ही तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. बायडन यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये ते ख्रिसमस ट्री सजवताना दिसत आहे.
पोप फ्रान्सिस यांनी शुभेच्छा दिल्या
पोप फ्रान्सिस यांनी ट्विट करून लिहिले, आज रात्री देव तुमच्याकडे येतो कारण तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाचे आहात. “तुम्ही त्रस्त असाल, अपराधीपणाने आणि अपुरेपणाच्या भावनेने ग्रासले असाल, जर तुम्ही न्यायासाठी भुकेले असाल तर तो तुमच्या पाठीशी आहे.
जस्टिन ट्रुडो यांनी व्हिडिओ संदेश शेअर केला आहे
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी एक व्हिडिओ (Video) संदेश ट्विट केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले, मेरी ख्रिसमस! लाखो कॅनेडियन लोकांप्रमाणे, माझे कुटुंब ख्रिसमसच्या झाडाभोवती एकत्र येण्यास आणि एकत्र काही दर्जेदार वेळ घालवण्यास उत्सुक आहे. आम्ही नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असताना, आम्ही तुम्हाला आनंद, आरोग्य, प्रेम आणि शांती तसेच शुभेच्छा देतो.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले...
ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले, हा देण्याचा दिवस आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा हा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोकांसाठी हा दिवस श्रद्धेचा आहे. तथापि, प्रत्येकाने हा दिवस आपल्या लोकांसोबत साजरा केला पाहिजे असे नाही. त्या सर्वांचे काम जबाबदारीने केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.