Pakistan Court: पाकिस्तानातील एका न्यायालयाने ख्रिश्चन तरुणाला ईशनिंदा केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे त्याला 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
नौमन मसीह (19) असे आरोपीचे नाव असून तो इस्लामी कॉलनी, बहावलपूर येथे राहणारा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी एका तक्रारीच्या आधारे नौमनला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपीने एका मेसेजिंग अॅपवर निंदनीय सामग्री शेअर केली होती. या प्रकरणाची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, फिर्यादीने त्याच्याविरुद्ध पुरावे आणि साक्षीदार सादर केल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
फिर्यादी पक्षाने मोबाईलचे फॉरेन्सिक रेकॉर्ड सादर केले होते. ज्यावरुन त्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून निंदनीय सामग्री शेअर केल्याचे सिद्ध झाले.
दुसरीकडे, काही साक्षीदारांनाही न्यायालयात हजर करण्यात आले, ज्यांनी सांगितले की आरोपीने निंदनीय सामग्री शेअर केली होती. मात्र, याआधीही ईशनिंदा संदर्भातील अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
जिथे कायदेशीर कारवाई सुरु होण्यापूर्वीच जमावाकडून आरोपींची (Accused) हत्या करण्यात आली. गेल्या महिन्यात 7 मे रोजी खैबर पख्तुनख्वा प्रांतातून असे प्रकरण समोर आले होते.
येथे निंदनीय टिप्पणी केल्याने जमावाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. पाकिस्तान हा अशा देशांपैकी एक आहे, जिथे ईशनिंदेसाठी फाशीची शिक्षा आहे.
यापूर्वी 24 मार्च 2023 रोजी पाकिस्तानातील (Pakistan) एका मुस्लिम व्यक्तीला व्हॉट्सअॅप ग्रुपवर निंदनीय मजकूर शेअर केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंधक कायदा आणि दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत पेशावर येथील न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.