नेपाळच्या राजधानीत पाणीपुरी नंतर स्ट्रीट फूड विक्रीवरही बंदी

नेपाळच्या लोकांना चमचमित खाण्याच मोह आवरावा लागणार शहरातील लोकांना स्ट्रीट फूडचा आनंद घेता येणार नाही.
panipuri
panipuri Dainik Gomantak
Published on
Updated on

काठमांडू: नेपाळच्या राजधानीत कॉलराचा जोरदार प्रसार होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी काठमांडूच्या खोऱ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे लोकांना चमचमित खाण्याच मोह आवरावा लागणार आहे. या आदेशामुळे शहरातील लोकांना स्ट्रीट फूडचा आनंद घेता येणार नाही. मात्र महापालिकेने हा निर्णय लोकहितासाठी घेतला असल्याचे सांगितले जात आहे. (Cholera in Nepal)

रविवारपासून या भागात कॉलराचे 12 रुग्ण आढळल्यानंतर काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटीने (KMC) रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरीय आरोग्य विभागाचे प्रमुख बलराज त्रिपाठी यांनी सांगितले की, काठमांडूमध्ये कॉलराच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे काही काळ खाद्यपदार्थांच्या विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.

panipuri
उदयपूर हत्याकांडातील आरोपींचं 'पाकिस्तान' कनेक्शन, कराचीत घेतलं प्रशिक्षण

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे. केएमसीने अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाला शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील अन्न स्वच्छता तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर काही सुचनाही दिल्या आहेत.

panipuri
कोरोना आणि ओमिक्रॉन 110 देशांमध्ये फैलावला - WHO

त्रिपाठी यांनी पाण्याच्या पाइपलाइन आणि मलनिस्सारण ​​व्यवस्थेच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे. पाणी शुद्धीकरण टॅब्लेटच्या कोणत्याही संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही महापालिकेने दिले आहेत. त्याचबरोबर जनतेला, स्वच्छ पाणी पिण्याचे, बाहेरचे खाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये कॉलराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कॉलरा हा एक संसर्गजन्य रोग आहे ज्यामध्ये रुग्णाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो. अस्वच्छ पाणी आणि खराब अन्नपदार्थामुळेहा आजार पसरतो. कॉलराचे जिवाणू प्रामुख्याने खराब झालेले अन्न आणि दूषित पाण्यामुळे पसरतो. अशा स्थितीत अन्न आणि पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com