Chinese President Xi Jinping: ड्रॅगनची घातक रणनिती, जिनपिंग यांनी घेतला युद्धाच्या तयारीचा आढावा

India-China Border: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या चिनी सैनिकांशी व्हिडिओ लिंकद्वारे चर्चा केली.
 China President Xi Jinping
China President Xi JinpingDainik Gomantak

Chinese President Xi Jinping: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या चिनी सैनिकांशी व्हिडिओ लिंकद्वारे संवाद साधला. शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मुख्यालयातून या सैनिकांना संबोधित केले आणि सैनिकांच्या युद्ध तयारीचा आढावा घेतला. चीनच्या अधिकृत मीडियाने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, पूर्व लडाखमधील (Ladakh) भारत-चीन सीमा ही सर्वात कठीण ठिकाणांपैकी एक आहे. येथे हिवाळ्यात तापमान उणे 20-30 अंशांपर्यंत खाली जाते. सीमेच्या रक्षणासाठी भारत आणि चीनचे हजारो सैनिक येथे तैनात आहेत. अरुणाचल प्रदेशमध्‍ये भारत आणि चीनच्‍या सैनिकांमध्‍ये नुकत्याच झालेल्या संघर्षानंतर जिनपिंग यांनी लडाख सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत चर्चा केली आहे.

 China President Xi Jinping
Indian Army: ड्रॅगन घाबरणार, पाकिस्तानला घाम फुटणार! भारतीय बॉर्डरवर AI यंत्रणा तैनात

चिनी सैन्य युद्धासाठी किती तयार ?

शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी या सैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. चीनच्या सरकारी मीडियाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, जिनपिंग यांनी या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना सांगितले की, 'या भागात सातत्याने घडामोडी घडत आहेत. आणि या घडामोडीचा लष्करावर परिणाम होत आहे.' शी जिनपिंग हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव तसेच PLA चे कमांडर-इन-चीफ देखील आहेत.

तसेच, सैनिकांशी झालेल्या संवादादरम्यान जिनपिंग यांनी चिनी सैनिक युद्धासाठी किती तयार आहेत, याचाही आढावा घेतला. चिनी एजन्सींच्या मते, एका सैनिकाने जिनपिंग यांना सांगितले की, 'आम्ही 24 तास सीमेवर दक्षतेने लक्ष ठेवून आहोत.'

 China President Xi Jinping
India Vs China: ड्रॅगनचे मनसुबे उधळून लावण्याची तयारी, पाकसाठीही धोक्याची घंटा; आता ड्रोन...

दुसरीकडे, चीनचे नवीन वर्ष सुरु होणार आहे. यानिमित्ताने जिनपिंग चीनच्या सैनिकांशी संवाद साधत आहेत. जिनपिंग पीएलए, पीपल्स सशस्त्र पोलीस दल आणि सैन्यात तैनात असलेल्या नागरिक, राखीव सैनिकांची भेट घेत असून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, जिनपिंग यांनी खुंजरेबमधील सीमेवर तैनात असलेल्या चिनी सैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

पूर्व लडाखमध्ये चकमक झाली

पूर्व लडाख हा असा प्रदेश आहे, जिथे 5 मे 2020 रोजी पॅंगॉन्ग सरोवर परिसरात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सुरु झाला. यानंतर 15 जून 2020 रोजी चीनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर हल्ला केला. चीनने केलेल्या या दगाबाजीत भारताचे कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांच्यासह 20 जवान शहीद झाले.

 China President Xi Jinping
Taliban China: ड्रॅगनची तेल निती ! तालिबान-चीन आले एकत्र; काय होणार भारतावर परिणाम

दुसरीकडे, चिनी सैन्यांनी हा हल्ला अचानक भारताच्या सैनिकांवर केला. तरीही त्यांना सडेतोड उत्तर मिळाले. भारतीयांनी केलेल्या प्रत्युत्तरात 30 हून अधिक चिनी सैनिक मारले गेले. मात्र अनेक महिन्यांनंतर चीनने या हल्ल्यात आपले 5 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले. पूर्व लडाख सीमेवरील गतिरोध दूर करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या 17 फेऱ्या झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com