चोरी आणि चाचेगिरी: ड्रगनने आधी लडाखमध्ये पॉवर ग्रीडला लक्ष्य केले आणि आता...

लडाखमधील भारत-चीन सीमेजवळील भागात ग्रीड नियंत्रण आणि वीज वितरणासाठी रिअल-टाइम ऑपरेशनसाठी जबाबदार असणार आहेत.
Chinese hackers news, China Hackers target Power Grid, Power Grid Hack News
Chinese hackers news, China Hackers target Power Grid, Power Grid Hack NewsDainik Gomantak
Published on
Updated on

चीन (Chaina) सरकारच्या संशयित हॅकर्सनी भारताच्या ऊर्जा क्षेत्राला टारगेट केले आहे. हॅकर्सनी उत्तर भारतातील किमान सात 'डिस्पॅच' केंद्रांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे म्हटले जात आहे, ही केंद्रे पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेजवळील भागात ग्रीड नियंत्रण आणि वीज वितरणासाठी रिअल-टाइम ऑपरेशनसाठी जबाबदार असणार आहेत. (Chinese hackers have targeted Indias energy sector)

Chinese hackers news, China Hackers target Power Grid, Power Grid Hack News
चिनी हॅकर्सचे आता भारतावर लक्ष्य !

आता केंद्र सरकारनेही (Central Government) याला दुजोरा दिला असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी सांगितले की, लडाखजवळील वीज वितरण केंद्रांना लक्ष्य करण्याचा चिनी हॅकर्सनी दोनदा प्रयत्न केले होते पण ते कुठेही यशस्वी झाले नाहीत. ते पुढे म्हणाले की, अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आम्ही आधीच आमची संरक्षण यंत्रणा मजबूत केली असल्याचे समजते आहे. (Power Grid Hack News)

या प्रकरणावर चीननचे काय मत?

आता चीनने हॅकिंगच्या प्रयत्नाबाबत आपली भूमिका मांडली, ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी माध्यमांशी बोलताना सायबर घटनांच्या तपासात पूर्ण पुरावे असायला हवेत आणि कोणत्याही सरकारी संबंधाशी निष्काळजीपणे संबंध जोडू नयेत, असे स्पष्ट मत मांडले आहे.

Chinese hackers news, China Hackers target Power Grid, Power Grid Hack News
इम्रान खान यांचाही परवेझ मुशर्रफ होणार? विरोधकांचा विजय झाला तर...

हॅकिंग ग्रुपच्या लिंक्स चीन सरकारशी जोडल्या आहेत

लोड डिस्पॅच सेंटरपैकी एकावर रेडेको नावाच्या हॅकिंग ग्रुपने यापूर्वीही हल्ला केला होता. रेकॉर्डर फ्युचरने अहवाल दिला आहे की हा गट एका मोठ्या हॅकिंग गटाशी जोडला गेला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या गटाला चीन सरकारशी जोडले, अहवालात असे म्हटले आहे की चीनी सरकारशी संबंधित हे हॅकिंग गट पॉवर ग्रिडला लक्ष्य करतात आणि आर्थिक आणि पारंपारिक बुद्धिमत्ता गोळा करतात आणि ज्याचा भविष्यात वापर केला जाऊ शकतो.

आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेलाही लक्ष्य केले लक्ष

यासोबतच हॅकर्सनी भारतातील नॅशनल इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम आणि एका बहुराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनीच्या उपकंपनीलाही टारगेट केले. TAG-38 नावाच्या या हॅकिंग ग्रुपने Shadowpad नावाचे धोकादायक सॉफ्टवेअर वापरले असल्याचे म्हटले जात आहे, तर या सॉफ्टवेअरच्या लिंक्स चिनी लष्कर आणि चीनच्या संरक्षण मंत्रालयाशी जोडल्या गेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com