Singapore Crime: चिनी नागरिकाकडून भारतीयाची हत्या; सिंगापूर कोर्टाने सुनावली जन्मठेपेसह 12 फटके मारण्याची शिक्षा!

Singapore Court: 2019 मध्ये एका नाइटक्लबबाहेर झालेल्या भांडणात चिनी वंशाच्या नागरिकाने भारतीय वंशाच्या नागरिकाची (Indian Origin Citizen) हत्या केली होती.
Singapore Crime
Singapore CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Singapore Crime: सिंगापूरमध्ये एका चिनी नागरिकाने भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या केली होती. आता भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी येथील न्यायालयाने (Court) चिनी वंशाच्या सिंगापूरच्या (Singapore) नागरिकाला दोषी ठरवून जन्मठेप आणि 12 फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. 2019 मध्ये एका नाइटक्लबबाहेर झालेल्या भांडणात चिनी वंशाच्या नागरिकाने भारतीय वंशाच्या नागरिकाची (Indian Origin Citizen) हत्या केली होती.

ही घटना एका क्लबबाहेर घडली

टेलिव्हिजन वृत्तवाहिनी न्यूज एशियाने वृत्त दिले आहे की, फिर्यादीने फाशीची शिक्षेची मागणी केली नव्हती. सिंगापूरमध्ये (Singapore) खुनाच्या गुन्ह्यात मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. ही घटना 2 जुलै 2019 रोजी ऑर्चर्ड रोड येथील टुरिस्ट हब परिसरातील हॉटेल आणि नॉटी गर्ल क्लबच्या बाहेर घडली होती.

Singapore Crime
Singapore: चार दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश; महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी

चाकू हल्ल्यात त्याचा मृत्यू

दरम्यान, दोषी टॅन सेन यांग (32) याला जुलै 2019 मध्ये क्लबबाहेर झालेल्या भांडणात 31 वर्षीय सतीश नोएल गोबिदास (Satish Noel Gobidas) याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले. टॅनसह सात जणांवर सुरुवातीला समान हेतूने हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. चाकू हल्ल्यात सतीशचा मृत्यू झाला होता.

भारतीय वंशाच्या व्यक्तीला 20 वर्षांची शिक्षा सुनावली

भारतीय वंशाच्या एका विवाहित व्यक्तीला अलीकडेच सिंगापूरमध्ये निर्दोष हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने (Court) त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावली. आरोपीने आपल्या प्रेमिकेचे इतर पुरुषांशी संबंध असल्याच्या रागातून तिला ढकलून दिले होते, यामध्ये तिचा मृत्यू झाला. एम कृष्णन असे दोषी व्यक्तीचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com