चीनी कंपनी हुआवेईवर पाकिस्तानात जासूसी केल्याचा आरोप: रिपोर्ट

हुआवेईने (Huawei) महत्त्वाची माहिती चोरी करत पाकिस्तानींची हेरगिरी केल्याचे दक्षिण आशियातील प्रेसने म्हटले आहे.
spying
spyingDainik Gomantak
Published on
Updated on

चीनमधील टेक कंपनी हुआवेईवर (Huawei) पाकिस्तानमध्ये (Pakistan) हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हुवावे पाकिस्तानींची हेरगिरी करत असून त्यांच्या संवेदनशील डेटावर (Sensitive Data) कब्जा केला आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे. अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनी बिझनेस एफिशिएन्सी सोल्युशन्स एलएलसीच्या (Business Efficiency Solutions LLC) माध्यमातून हुआवेईने महत्त्वाची माहिती चोरी करत पाकिस्तानींची हेरगिरी केल्याचे दक्षिण आशियातील प्रेसने म्हटले आहे.

spying
सावधान! 'ही' गाणी वाजवाल तर जेल मध्ये जाल, चीनचा फतवा

बिझनेस एफिशिएन्सी सोल्युशन्सने सॉफ्टवेअर तयार केले आहे, जे पाकिस्तानी सरकारसाठी संवेदनशील माहिती गोळा करते. हुआवेईने कंपनीला परिक्षणासाठी चीनमधील त्यांच्या प्रयोगशाळेत संवेदनशील माहिती पाठवण्यास सांगितले आहे. साऊथ एशिया प्रेसने सांगितले की, सॉफ्टवेअर कंपनीने दावा केला आहे की बीजिंगने अद्याप माहिती आणि सॉफ्टवेअर साधने परत केली नाहीत ज्याद्वारे त्यांनी पाकिस्तानमधील संवेदनशील डेटा मिळविण्यासाठी बॅकडोअर प्रवेश मिळवला, जो राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर आहे.

spying
चीनची ‘वैक्सीन डिप्लोमेसी’! ड्रॅगन जगाला देणार मोफत लस

गेल्या आठवड्यात, चीनने व्यवसायीक हितसंबंधाच्या नावावर करण्यासाठी इस्रायलमधील अनेक सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील गटांतील डेटा हॅक केला. चीनने इराण, सौदी अरेबिया आणि इतर देशांमध्ये असेच सायबर हल्ले अनेक वेळा केले आहेत. सायबर सिक्युरिटी फर्म फायरईने म्हटले होते की, बीजिंग व्यवसाय करताना मध्य पूर्व देशांच्या विस्तृत श्रेणीची हेरगिरी करण्यासाठी चीनी बनावटीच्या सायबर साधनांचा वापर करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com