Chinese Space Station: चीनचे स्पेस स्टेशन 'तियांगॉन्ग' अंतराळात झाले कार्यरत; 'हा' आहे नावाचा अर्थ

चीन स्वतःचे कायमस्वरूपी अंतराळ स्थानक चालवणारा जगातील तिसरा देश
Chinese Space Station
Chinese Space StationDainik Gomantak
Published on
Updated on

Chinese Space Station: सध्या अंतराळात कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) यापुढे मानव असलेले अंतराळातील एकमेव अंतराळ स्थानक असणार नाही. कारण आता चीनचे अंतराळ स्थानकदेखील अंतराळात कार्यरत झाले आहे. चीनच्या या अंतराळ स्थानकाचे नाव आहे 'तियांगॉन्ग'.

Chinese Space Station
Russia Ukraine War: 20 हवाई हल्ले आणि 60 रॉकेट डागून रशियाने युक्रेनचे शहर केले बेचिराख

चीनी मँडरिन भाषेतील शब्द असलेल्या 'तियांगॉन्ग' चा अर्थ आहे 'स्वर्गातील महाल'. याच वर्षी 29 नोव्हेंबर रोजी चीनने गोबी वाळवंटातून शेंजू-15 मोहीम सुरू केली होती. या मोहिमेतून तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यात आले होते. सहा तासांनी हे अंतराळवीर त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचले. या मोहिमेंतर्गत अंतराळात गेलेले तीन अंतराळवीर तिथे आधीच असलेल्या क्रूची जागा घेतील. आधीच्या क्रुने स्थानकाच्या बांधकामात मदत केली आहे.

या मोहिमेतील यशामुळे चीन स्वतःचे कायमस्वरूपी अंतराळ स्थानक चालवणारा जगातील तिसरा देश बनला आहे. या यशामुळे अमेरिका आणि रशिया या जगातील दोन सर्वोच्च अवकाश शक्तींमध्ये चीनचे स्थान मजबूत होणार आहे.

Chinese Space Station
Elon Musk: इलॉन मस्क यांची ट्विटर कर्मचार्‍यांना धमकी; तर...थेट खटला करणार दाखल

असे आहे 'तियांगॉन्ग' स्थानक

चीनला हे स्थानक उभारण्यासाठी तीन दशकांचा कालावधी लागला आहे. हे स्टेशन 180 फूट (55 मीटर) उंच आहे आणि त्यात तीन 'मॉड्यूल' आहेत जे स्वतंत्रपणे लॉन्च केल्यानंतर अवकाशात एकत्र केले गेले. यातील कोअर 'मॉड्युल'मध्ये सहा अंतराळवीर राहू शकतात. याशिवाय, 3,884 घनफूट (110 घन मीटर) चे दोन मॉड्यूल आहेत. स्टेशनमध्ये बाह्य रोबोटिक्स विभाग आहे, जो स्टेशनच्या बाहेरील कामांवर आणि प्रयोगांवर लक्ष ठेवतो. या स्पेस स्टेशनमध्ये तीन डॉकिंग पोर्ट आहेत. तिआंगॉन्ग हे स्पेस स्टेशन 1980 च्या दशकातील सोव्हिएत स्पेस स्टेशन 'मीर' सारखे आहे, पण ते अत्याधुनिक आहे.

दरम्यान, अवकाशातील सध्या जे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे ते अमेरिकेची नासा, रशियाची रॉसकॉसमॉस, जपानची जाक्सा, युरोपची युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडाची कॅनेडियन स्पेस एजन्सी या संस्थांनी एकत्रित प्रयत्नांतून उभारले आहे. चीनने मात्र तियांगॉन्ग हे स्थानक एकट्याने, स्वतःच्या बळावर विकसित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com