चीनची मोठी कामगिरी; मंगळ ग्रहावर उतरवला पहिला रोवर

Chinas great performance The first rover landed on Mars
Chinas great performance The first rover landed on Mars
Published on: 
Updated on: 

चीनच्या (China) अवकाश एजन्सी चायना नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन (सीएनएसए)  देशातील पहिले रोव्हर मंगळ ग्रहावर (Mars Planet) घेऊन जाणारे अवकाशयान 'लाल' ग्रहावर दाखल झाले आहे. 23 जुलै 2020 रोजी ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर घेऊन जाणारे ‘तिआनवेन-1' (Tianwen1) अंतराळ यान लॉन्च करण्यात आले होते. अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने वृत्त दिलं आहे की सौर यंत्रणेत पुढील शोध लावण्याच्या उद्देशाने परिभ्रमण (कक्षा) पूर्ण करणे, लँडिंग करणे आणि फिरणे या उद्देशाने चीनचे मंगळ ग्रहाच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल आहे. (Chinas great performance The first rover landed on Mars)

सुमारे सात महिने प्रवास करून अंतराळ यान फेब्रुवारी महिन्यात मंगळाच्या कक्षेत गेलं आणि दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ या ग्रहावर जाण्यासाठी संभाव्य स्थानांची ओळख करण्यात घालवला. मंगळावर पोहोचणार्‍या रोव्हरचे वजन सुमारे 240 किलो आहे, सहा चाके आणि चार सौर पॅनेल आहेत आणि ताशी 200 मीटर पर्यंत फिरता येते. यात बहु-आयामी कॅमेरा, रडार आणि एक हवामानशास्त्रीय उपायांसह सहा वैज्ञानिक उपकरणे आहेत. मंगळावर सुमारे तीन महिने काम करणे अपेक्षित आहे.

संयुक्त अरब अमिराती, अमेरिका (America) आणि चीन यांची अवकाशातील जहाजे नुकतीच मंगळाच्या कक्षेत दाखल झाली. सुमारे सात महिन्यांच्या प्रवासानंतर नासाचा 'पर्कशन रोव्हर 18' फेब्रुवारीमध्ये मंगळावर पोहोचले होते. यापूर्वी अमेरिका, रशिया, युरोपियन युनियन आणि भारत मंगळावर अवकाशयान पाठविण्यात यशस्वी झाले होते. 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेमध्ये यशस्वीरित्या आपले अंतराळ यान पाठविणारा भारत (India) पहिला आशियाई देश बनला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com