चीन (China) तैवानच्या (Taiwan) हवाई क्षेत्राचे सतत उल्लंघन करत आहे. यातच आता तैवानचे म्हणणे आहे की, चीनने 19 लष्करी विमाने (Military Aircraft) तैवानच्या हद्दीत उतरली आहेत. यामध्ये अणुबॉम्ब टाकणाऱ्या विमानांचा समावेश आहे. ही घटना रविवारी दक्षिण -पश्चिम एअरस्पेसमध्ये घडली. आंतरराष्ट्रीय चेतावणी असूनही, चीनी हवाई दलाची विमाने तैवानमध्ये घुसखोरी करत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense of Taiwan) सांगितले की, त्यांनी एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये (ADIZ) उडणारी 19 चीनी विमाने शोधली आहेत. त्यानंतर क्रू चालविणाऱ्याला चेतावणी देण्यात आली.
मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तेथे तैनात रडार आणि क्षेपणास्त्र यंत्रणेनेही चीनच्या हालचालींचाही शोध घेण्यात आला आहे. या विमानांमध्ये चार H-6 बॉम्बर्स, 10 J-16 फायटर जेट्स आणि 4 सुखोई Su-30 जेट्सचा समावेश होता. या व्यतिरिक्त, Y-8 विमान आणि लवकर चेतावणी देणारी विमानेही या घुसखोरीचा भाग (China Taiwan Aggression) होती. या प्रकरणी चीनकडून आतापर्यंत काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु 15 जूननंतरची चीनची ही सर्वात मोठी घुसखोरी मानली जात आहे.
जूनमध्ये 28 विमाने घुसली
याआधी जून महिन्यात चीनी हवाई दलाची 28 विमाने ADIZ मध्ये दाखल झाली होती. यामध्ये लढाऊ विमाने आणि बॉम्बिंग विमानांचा समावेश होता. त्या घुसखोरीनंतर, देशांच्या G-7 गटाने अनेक मुद्द्यांवर चीनवर टीका करत तैवान सामुद्रधुनीमध्ये शांतता आणि स्थिरतेलसंबंधी पुन्हा एकदा पुनरुच्चार करण्यात आला होता. बीजिंग तैवानवर आपल्या देशाचा भाग असल्याचा दावा करत आला आहे. 2016 मध्ये त्साई इंग-वेन (Tsai Ing-wen) पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून निवडल्यापासून चीनवर दबाव वाढवत आहेत.
तैवानचे फक्त 15 देशांशी संबंध आहेत
तैवानच्या बाबतीत, कोणत्याही देशाने काहीही म्हटले किंवा काही पाऊले उचलल्यास चीन त्या देशावर कठोर निर्बंध लादतो. अलीकडेच, तैवान सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन जहाजांच्या उपस्थितीचा चीनने निषेध केला होता. चीन तैवानला आपलाच भाग असल्याचे मानतो. असे असले तरी, तैवान आपल्या व्यापारी कार्यालायाच्या माध्यमातून अमेरिका आणि जपानसह सर्व प्रमुख देशांशी (China Taiwan Conflict) अनौपचारिक संबंध ठेवतो. ही कार्यालये प्रत्यक्षात त्याचे दूतावास मानले जातात. चीनच्या दबावामुळे तैवानचे केवळ 15 देशांशी राजनैतिक संबंध आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.