Shanghai Covid-19: रुग्णालयात मृत घोषित केलेला व्यक्ती शवागारात सापडला जिवंत

सुमारे 26 दशलक्ष लोकसंख्या असलेले या शहरात जागतिक दर्जाच्या सुविधा उपल्बध असून कोरोनाच्या विळख्यात आहे.
Death Body
Death BodyDainik Gomantak
Published on
Updated on

बीजिंग: चीनच्या (China) शांघाय शहरात एका ज्येष्ठ नागरिकाला चुकून मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवागारातही पाठवण्यात आला. मात्र तेथे तो व्यक्ती जिवंत आढळला. हाँगकाँगच्या 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट' या वृत्तपत्राने सोमवार, 2 मे रोजी बातमी प्रकाशित केली. त्यानुसार चीनच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Shanghai Covid-19 Situation)

Death Body
CIA चे नवीन टेक चीफ नंद मूलचंदानी कोण? दिल्लीतील 'या' शाळेतून घेतले शिक्षण

रविवारी शांघायच्या झिन्चांगझेंग हॉस्पिटलच्या बाहेर एक मोठी पिवळी पिशवी दिसूनय येते आहे. येथे काम करणारे लोकं शवगृह कामगारांसारखे दिसत आहेत. दोघेही हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यासमोर बॅग उघडताना आणि हा माणूस जिवंत आहे असे जोरजोरात म्हणत आहेत. या घटनेनंतर शांघायमधील लोकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास घेणे सुरू केले आहे.

सुमारे 26 दशलक्ष लोकसंख्या असलेले हे शहर चीनची आर्थिक राजधानी आहे. जागतिक दर्जाच्या मूलभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. असे असतानाही महिनाभराहून अधिक काळ शहर कोरोनाच्या विळख्यात आहे. 1 मार्चपासून येथे कोरोना संसर्गाची सुमारे 5 लाख प्रकरणे नोंदली गेली आहेत. जवळपास दीड महिन्यापासून येथे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.

Death Body
रशिया-युक्रेन युद्धामुळे 'भारत' चिंतेत

शांघायमध्ये आता लोकांचे खाण्यापिण्याचे पदार्थ संपले आहेत अशा बातम्या आता येऊ लागल्या आहेत. खिडकीतून डोकावत घोषणाबाजी करत सरकारच्या कडक धोरणाचा लोकं निषेध करत आहेत. लोकांना या शहरातून स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com