व्हिएतनामी लोकांना चीन वागवतोय जनावरासारखं !

सर्बियातील (Serbia) साखर कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, आम्हाला अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहे, जेथे थंडीपासून वाचण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.
Vietnam Workers
Vietnam WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

Vietnam Workers at Chinese Factory: चिनी कंपनीने येथे काम करणाऱ्या लोकांशी अमानुष वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्बियातील (Serbia) साखर कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, आम्हाला अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहे, जेथे थंडीपासून वाचण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. इथे ना अन्न मिळते ना पैसा. कंपनीच्या मालकाने या लोकांकडून त्यांचे पासपोर्टही काढून घेतले आहेत. जेणेकरुन ते त्यांच्या देशात परत जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे ते सर्बियामध्ये अडकले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नाही.

दरम्यान, याच व्हिएतनामच्या कर्मचाऱ्यांनी आपले रक्त आणि घाम गाळून युरोपमधील पहिला चीनी कार टायर कारखाना उभारला. न्यूज एजन्सी एपी उत्तर सर्बियामध्ये त्या ठिकाणी गेली, जिथे त्यांना 500 व्हिएतनामी लोक गंभीर संकटात सापडले आढळून आले आहेत. ते सर्व चीनच्या शेंडॉन्ग लिंगलांग टायर कॉर्पोरेशन कंपनीसाठी (Chinese Factory Workers) काम करतात. सर्बियन आणि चिनी अधिकारी या प्रकल्पाला दोन्ही देशामधील 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप' मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र टायर उत्पादनातून होणाऱ्या संभाव्य धोकादायक प्रदूषणावर पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Vietnam Workers
कमला हॅरिस बनल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

लोकांच्या मानवी तस्करीचा धोका वाढला

पर्यावरणानंतर आता येथील कर्मचाऱ्यांच्या मानवी हक्कांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. हे लोक मानवी तस्करी किंवा गुलामगिरीचे बळी ठरु शकतात, असे बोलले जात आहे. “आम्ही येथे मानवी हक्कांचे उल्लंघन (China Human Rights Violations) पाहत आहोत, कारण व्हिएतनामी (Worker) भयंकर परिस्थितीत काम करत आहेत,” असे सर्बियन एनजीओमध्ये काम करणारे कार्यकर्ते मिसो झिवानवो यांनी सांगितले. त्यांचा पासपोर्ट आणि इतर ओळखीची कागदपत्रे त्याच्या चिनी मालकांनी काढून घेतली आहेत. ते मे महिन्यापासून इथेच आहेत. ते परत व्हिएतनामला जाण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी त्यांना आधी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

कोरोना संसर्गावर उपचार होत नाहीत

विशेष म्हणजे या कामगारांना झोपण्यासाठी आवश्यक सांधनांचीही पूर्तताही चीनी कंपनी करत नाही. यापैकी काही कामगारांमध्ये कोरोनाची लक्षणे (Covid-19 Symptoms) देखील दिसू लागली आहेत. त्यांच्या व्यवस्थापकांनी त्यांना खोलीत बंद करुन ठेवले आहे. गुयेन व्हॅन तेरी नावाच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, नोकरीच्या करारानुसार इथे काहीही होत नाही. सर्बियाला जाण्यापूर्वी मी व्हिएतनाममध्ये करारावर स्वाक्षरी केली होती. तो पुढे म्हणाला, 'आम्ही इथे आलो तेव्हापासून काहीही चांगलं घडत नाही. व्हिएतनाममध्ये स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांपेक्षा इथे सगळंच वेगळं आहे. इथे निरुपयोगी जीवन असून अन्न, पाणी... सर्व काही व्यर्थ आहे.

आंदोलकांची गोळीबार

दरम्यान थंडीत थरथरणाऱ्या या माणसाने पुढे सांगितले की, आमच्यासोबत काम करणारे 100 इतर लोक आंदोलन करण्यासाठी बसले होते, त्यापैकी अनेकांना नोकरीवरुन काढण्यात आले. स्वतःवरील आरोप फेटाळून लावत, चिनी कंपनीने सर्व दोष व्हिएतनामच्या जॉब एजन्सींवर (Chinese Investment in Serbia) टाकले आहेत.' सर्बिया हा युरोपमधील असा देश बनला आहे, जिथे चीन मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. चिनी कंपन्या येथे मोठ्याप्रमाणात कार्यरत आहेत. या कंपन्या प्रदूषण विरोधी कायदे आणि कामगार नियमांचे उल्लंघन करत आहेत. चीनी बँकांनी सर्बियाला महामार्ग, रेल्वे आणि कारखाने बांधण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची कर्जे दिली आहेत. सर्बिया या बदल्यात चीनी कंपन्यांना पैसा देतो, त्यातून देशात विकासाशी संबंधित कामे होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com