China Big Bank Scam: चीनमध्ये मोठ्या बॅंक घोटाळ्याचा पर्दाफाश, 234 जणांना अटक

Bank Scam: चीनमध्ये मोठा बँक घोटाळा उघडकीस आला आहे.
China Money
China MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

China Big Bank Scam: चीनमध्ये मोठा बँक घोटाळा उघडकीस आला आहे. ग्रामीण बँकांमध्ये उच्च व्याजदराचे खोटे आश्वासन देऊन लोकांच्या आयुष्यभराच्या ठेवी लुटल्याप्रकरणी पोलिसांनी 234 जणांना अटक केली आहे. हे प्रकरण $580 दशलक्ष म्हणजेच 46.3 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. यावेळी बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. याप्रकरणी आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोमवारी मध्य चीनमधील अधिकाऱ्यांनी ग्रामीण बँकांमधील (Bank) ठेवींवर जास्त व्याजदर देण्याचे खोटे आश्वासन देऊन लोकांची 46.3 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली.

China Money
China मधील जगात सर्वात मोठे असलेले ईलेक्ट्रॉनिक मार्केट बंद

असे रचले षड्यंत्र

हेनान प्रांतातील शुचांग शहरातील पोलिसांनी (Police) या घोटाळ्याशी संबंधित 234 संशयितांना अटक केली. चोरलेले पैसे जप्त करण्यात आल्याचे मध्य चीनच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. लू यिवेईने हा कट रचला आणि तो मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याने हेनान प्रांतातील चार ग्रामीण बँका बेकायदेशीरपणे चालवल्या आणि त्यांचा पूर्ण ताबा घेतला. आरोपी गुंतवणूकदारांना ठेवींवर वार्षिक 13 ते 18 टक्के व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवत असत. गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन त्यांनी हा बँक घोटाळा केला.

China Money
China US Tension: ड्रॅगनला अमेरिकेचं चोख प्रत्युत्तर, तैवानच्या सागरात दोन युध्दनौकांची एन्ट्री

बँकांच्या ऑनलाइन सेवा बंद

हेनानमधील या चार ग्रामीण बँकांनी 18 एप्रिलपासून त्यांच्या ऑनलाइन बँकिंग सेवा बंद केल्या होत्या. बँकांनी सिस्टम अपग्रेडचा हवाला देत ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यास बंदी घातली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com