China Corruption Case: अब्जावधींची लाच घेतल्याप्रकरणी चीनी कोर्टाने बँकरला सुनावली फाशीची शिक्षा; ‘’गुन्हा अक्षम्य आहे...’’

China Corruption Case: चीनमध्ये भ्रष्टाचाराचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. येथे कोट्यवधींच्या लाचखोरीच्या आरोपाखाली एका पूर्व बँकरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
China Corruption Case
China Corruption CaseDainik Gomantak

China Corruption Case: चीनमध्ये भ्रष्टाचाराचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. येथे कोट्यवधींच्या लाचखोरीच्या आरोपाखाली एका पूर्व बँकरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चीनमध्ये अशा गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा देण्याचे हे प्रकरणही चर्चेत आहे, कारण याच न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी एका चिनी अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, 2012 मध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (President Xi Jinping) यांनी सत्ता हाती घेतल्यापासून चीन सरकारने भ्रष्टाचाराबाबत कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या काही वर्षांतील भ्रष्टाचाराविरुद्धच्या (Corruption) क्रॅकडाउनमध्ये अनेक चिनी अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये जन्मठेप ही सर्वोच्च शिक्षा आहे. परंतु, तीन वर्षांत दोन प्रकरणे दुर्मिळ आहेत, ज्यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

China Corruption Case
China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने बुधवारी वृत्त दिले की, न्यायालयाने 151 दशलक्ष डॉलर्सची लाच घेतल्याप्रकरणी पूर्व बँकरला फाशीची शिक्षा सुनावली आहे. चायना हुआरोंग इंटरनॅशनल होल्डिंग्ज (सीएचआयएच) चे माजी महाव्यवस्थापक बाई तियानहुई यांना तिआनजिन येथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

China Corruption Case
India China Border: सीमाविवादावर PM मोदींच्या टिप्पणीनंतर आली चीनी लष्कराची प्रतिक्रिया; म्हणाले, ''सध्या सीमावर्ती भागात...''

न्यायालयाने म्हणाले केले- गुन्हा अक्षम्य आहे

तिआनजिन येथील न्यायालयाने (Court) दिलेल्या निकालानुसार, त्याचे आजीवन राजकीय अधिकार हिरावून घेण्यात आले आणि सर्व मालमत्ताही जप्त करण्यात आली. मोठ्या रकमेच्या बदल्यात आरोपीने प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असे न्यायालयाने म्हटले. आरोपीची कृती गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फाशीची शिक्षा मिळालेले बाई हे दुसरे चिनी अधिकारी आहेत. जानेवारी 2021 मध्ये, याच न्यायालयाने CHAM चे माजी अध्यक्ष लाइ शिओमिन यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com