अॅमेझॉनमध्ये युवकांना नोकरीची संधी!

येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी 55,000 लोकांना कामावर घेण्याची योजना आखत आहे, असे कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जस्सी (Andy Jassi) यांनी सांगितले.
Andy Jassi
Andy JassiDainik Gomantak
Published on
Updated on

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन (Amazon) मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणार आहे. अॅमेझॉन डॉट कॉम इंक (AMZN.O) येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी 55,000 लोकांना कामावर घेण्याची योजना आखत आहे, असे कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जस्सी (Andy Jassi) यांनी सांगितले. जुलैमध्ये सीईओ म्हणून पदभार स्वीकारलेल्या जस्सी यांनी पत्रकारांना दिलेल्या पहिल्या मुलाखतीत सांगितले की, कंपनीला रिटेल, क्लाउड आणि जाहिरातींमधील मागणीसह इतर व्यवसायांशी जुळवून घेण्यासाठी अधिक लोकांची गरज आहे.

दरम्यान, ते पुढे म्हणाले की, कंपनीच्या प्रोजेक्ट कुइपरसाठी (Project Kuiper) नवीन लोकांचीही गरज आहे. अॅमेझॉन ब्रॉडबँडचा वापर सुलभ करण्यासाठी या प्रकल्पाद्वारे उपग्रह कक्षेत सोडणार आहे. अॅमेझॉनचा वार्षिक रोजगार मेळावा 15 सप्टेंबरपासून सुरु होणार असून अपेक्षेप्रमाणे लोकांना भरती करण्याची ही चांगली संधी आहे. अमेरिकन सर्वेक्षणाचा हवाला देत ते म्हणाले, “कोरोना काळात बर्‍याच नोकऱ्यांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे अनेकजण नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत.”

Andy Jassi
Amazon Prime Day Sale 2021: सॅमसंग, वनप्लस आणि शाओमीवर बिग डिस्काउंट

कोणत्या प्रकारच्या पदांची भरती केली जात आहे?

अँडी जॅसी म्हणाले, 'कंपनीतील प्रत्येकाला स्वातंत्र्य असून ते अधिक चांगले काम कसे करु शकतात हे पाहण्याची गरज आहे. आणि त्यानुसार सुधारणा करण्याचे मार्ग काढले जाऊ शकतात. '' अँडी जॅसी पुढे म्हणाले, अमेझॉन ज्या पदांवर भरती करत आहे. त्यात इंजिनीअरिंग, रिसर्च सायन्स आणि रोबोटिक्स (Amazon Hiring Process) यांचा समावेश आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची खासगी नियोक्ता अॅमेझॉनने 2020 मध्ये 500,000 हून अधिक लोकांना नोकरी दिली. ही भरती मुख्यत्वे वेअरहाऊसिंग आणि डिलिव्हरी संबंधित कामासाठी होती.

Andy Jassi
Amazon Saheli Program: अ‍ॅमेझॉन महिलांना देत आहे विशेष लाभ

पगारामध्ये मोठी गुंतवणूक

खरेदीदारांची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात गोदामे बांधण्यासाठी आणि कामगारांना आकर्षित करण्यासाठी वेतन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. अँडी जॅसी म्हणाले, "आम्ही किमान $ 15 हजार वेतनाचे समर्थन केले असून काही राज्यांसाठी प्रत्यक्ष प्रारंभिक वेतन प्रति तास $ 17 डॉलर पर्यंत असणार आहे." उर्वरित भरती भारत, जर्मनी आणि जपानसह इतर देशांमध्ये होईल (Amazon Hiring in India). अॅमेझॉनचा जॉब फेअर जागतिक स्तरावर आयोजित केला जाईल. याचा अर्थ जगभरातील लोक त्यात सहभागी होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com