संगणक आणि गेमिंग (Computer And Gaming) क्षेत्रात मुलांच्या संपूर्ण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वाधिक काम करणारे ब्रिटिश शोधक आणि उद्योजक क्लाइव्ह सिंक्लेअर (Clive Sinclair) यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. 19 व्या दशकाच्या सुरुवातीला प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सिंक्लेअर यांची अखेर प्राणज्योत गुरुवारी सकाळी मालवली. त्यांच्या मुलीने सांगितले की, माझे वडील शेवटच्या क्षणापर्यंत नवीन शोधांवर काम करत होते. ते आविष्कार करणारे कल्पनाशील होते."
1940 मध्ये दक्षिण -पश्चिम लंडनच्या (London) उपनगरातील रिचमंड (Richmond) येथे जन्मलेल्या, सिनक्लेअरने वयाच्या 17 व्या वर्षीच शाळेचा त्याग केला आणि पत्रकारितेकडे वळले. यानंतर त्यांनी नवीन शोधांसह नवीन मार्ग स्वीकारला. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी आपली पहिली कंपनी सिंक्लेअर रेडिओनिक्सची स्थापना केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.