ओमिक्रॉनच्या 'विळख्यात' अडकले ब्रिटन

ओमिक्रॉन प्रकार इंग्लंडच्या सर्व क्षेत्रांमध्ये जलद गतीने वाढत आहे.
Omicron variant
Omicron variantDainik Gomantak
Published on
Updated on

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन प्रकाराची आणखी 448 प्रकरणे आढळून आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशात आढळलेल्या एकूण प्रकरणांची संख्या 1,139 वर पोहोचली आहे.

Omicron variant
Pride for India: व्हाईट हाऊसचा उच्च अधिकारी एक भारतीय!

ओमिक्रॉन (Omicron variant) प्रकार इंग्लंडच्या (England) सर्व क्षेत्रांमध्ये जलद गतीने वाढत आहे. सध्याच्या दराने जर ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत राहिले तर महिन्याच्या अखेरीस ब्रिटनमध्ये एकूण 1 दशलक्ष प्रकरणे दिसू शकतात, असे यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या (UKHSA) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील काही महिन्यात ब्रिटनमध्ये 58,194 नवीन कोरोना (Corona) बंधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशामध्ये एकूण कोरोनाव्हायरस प्रकरणांची संख्या 10,719,165 झाली आहे. देशात आणखी 120 कोरोनाव्हायरस-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरस-संबंधित मृत्यूची एकूण संख्या आता 146,255 आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये 12 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या 89 टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचा (Vaccine) पहिला डोस मिळाला आहे आणि 81 टक्क्यांहून अधिक लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. 38 टक्क्यांहून अधिक लोकांना बूस्टर जॅब्स किंवा कोरोनाव्हायरस लसीचा तिसरा डोस मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com